कोरोना सुद्धा एक जीव, त्यालाही जगण्याचा अधिकार; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचं अजब तर्कट

देशभरात कोरोनाचं संकट वाढलं आहे. शेकडो लोकांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं असतानाच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी अजबच विधान केलं आहे. (Covid virus has a right to live, says ex-CM Trivendra Singh Rawat)

कोरोना सुद्धा एक जीव, त्यालाही जगण्याचा अधिकार; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांचं अजब तर्कट
trivendra singh rawat
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 10:23 AM

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाचं संकट वाढलं आहे. शेकडो लोकांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं असतानाच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी अजबच विधान केलं आहे. कोरोना व्हायरस हा सुद्धा एक जीव आहे. त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, असं धक्कादायक विधान त्रिवेंद्रसिंह रावत यांनी केलं आहे. त्यांचं हे विधान व्हायरल होत असून त्यावर लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. (Covid virus has a right to live, says ex-CM Trivendra Singh Rawat)

दार्शनिक दृष्टीकोणातून पाहिलं तर कोरोना व्हायरस सुद्धा जिवंत जीव आहे. इतर लोकांप्रमाणेच त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. परंतु आपण मानव त्याच्यापेक्षा स्वत:ला बुद्धिमान समजतोय आणि त्याला नष्ट करायला निघालो आहोत. त्यामुळेच कोरोना व्हायरस वारंवार स्वत:ला बदलत आहे, असं त्रिवेंद्रसिंह रावत म्हणाले. मानवाला जर सुरक्षित राहायचे असेल तर त्याने व्हायरसच्या पुढे निघून गेलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियातून प्रचंड टीका होत असून रावत यांना ट्रोल केलं जात आहे.

कोरोनाचं आधार, रेशनकार्डही असावं

अशा लोकांच्या विधानवर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. आपला देश जगात कोरोनाच्या संकटाचा सर्वाधिक सामना करत आहे, असं काँग्रेस नेते गौरव पंधी यांनी सांगितलं. तर, या व्हायरस जीवाला सेंट्रल व्हिस्टामध्ये आसरा द्यायला हवा, असं टोला एका यूजर्सने लगावला आहे. कोरोनना एक प्राणी आहे. मग त्याला आधार कार्ड आणि रेशन कार्डही असायला हवं, असा चिमटा राष्ट्रीय युथ काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी काढला आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या आठवड्यात 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. त्यानंतर कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत. गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 43 हजार 144 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 44 हजार 776 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

दरम्यान, भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 40 लाख 46 हजार 809 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 62 हजार 317 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. देशात 2 कोटी79 हजार 599 रुग्ण बरे झाले आहेत. तर 37 लाख 4 हजार 893 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 17 कोटी 72 लाख 14 हजार 256 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (Covid virus has a right to live, says ex-CM Trivendra Singh Rawat)

संबंधित बातम्या:

 देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 19 हजारांनी घट, कोरोनामुक्तांचा आकडा दोन कोटींपार

मुंबईकरांना दिलासा, दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट, रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला

ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान भारतात लसीचे 216 कोटी डोस उपलब्ध होणार, कोविशील्ड, कोव्हॅक्सिनसह अन्य कोणत्या लस मिळणार?

(Covid virus has a right to live, says ex-CM Trivendra Singh Rawat)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.