गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचं इन्फेक्शन होत नाही, मीही पिते, मला कोरोना झाला नाही: प्रज्ञासिंह ठाकूर
नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेल्या भाजपच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आता नव्या विधानाने चर्चेत आल्या आहेत. (cow urine can treat lung infection says bjp mp pragya singh thakur)
भोपाळ: नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेल्या भाजपच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आता नव्या विधानाने चर्चेत आल्या आहेत. त्यांनी नागरिकांना आता गोमूत्र पिण्याची आणि गो पालन करण्याचं आवाहन केलं आहे. गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचा संसर्ग दूर होतो. मी स्वत: गोमूत्रं घेते, त्यामुळेच मला कधी कोणतं औषध घ्यावं लागलं नाही. मला कोरोनाही झाला नाही, असं प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. (cow urine can treat lung infection says bjp mp pragya singh thakur)
एक कोटी वृक्ष लावणार
संत नगरमधील डॉ. हेडगेवार रुग्णालयाला 25 ऑक्सिजन कंसन्ट्रेटर देण्यासाठी प्रज्ञासिंह ठाकूर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे अजब विधान केलं. देशी गाय पाळण्याचं त्यांनी आवाहन केलं. तसेच एक कोटी वृक्ष लावणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
कोरोना नियमांचं पालन करा
या संकटाच्या प्रसंगी सर्वांनी सावध राहिलं पाहिजे. कोरोनाशी संबंधित गाईडलाईन सर्वांनी पाळली पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं. मध्य प्रदेशात कोरोनाचा प्रचंड कहर वाढला आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या बंगल्यातील सर्व कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ठाकूर यांना क्वॉरंटाईन व्हावं लागलं होतं.
देशात गेल्या 24 तासांत 4,106 जणांचा मृत्यू
देशात गेल्या 24 तासांत तब्बल 2,81,386 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,78,741 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच कोरोनामुळे गेल्या 24 तासांत देशात 4,106 जणांनी जीव गमावला आहे. देशातील सध्याची कोरोना रुग्णांची संख्या 2,49,65,463 झाली असून आतापर्यंत 2,11,74,076 बरे होऊन गेले आहेत. आतापर्यंत देशात 2,74,390 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 35,16,997 एवढी झाली आहे. तर देशात आतापर्यंत 18,29,26,460 नागरिकांचं लसीकरण झालं आहे. (cow urine can treat lung infection says bjp mp pragya singh thakur)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 17 May 2021 https://t.co/pMmW2GGGNq #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2021
संबंधित बातम्या:
Tauktae Cyclone | कुठे झाडांची पडझड, कुठे घरांचे नुकसान, महाराष्ट्रात तौत्के चक्रीवादळाचा हाहा:कार
(cow urine can treat lung infection says bjp mp pragya singh thakur)