Shikhar Dhawan Divorce : शिखर धवन याचा पत्नी आयशा हिच्याशी घटस्फोट; असं काय घडलं दोघात?

प्रसिद्ध क्रिकेटपटू शिखर धवन याचा पत्नी आयशा मुखर्जीसोबत घटस्फोट झाला आहे. कोर्टाने हा घटस्फोट मंजूर केला आहे. शिखर धवनने कोर्टात घटस्फोटोसाठी केलेल्या अर्जात पत्नीवर गंभीर आरोप केले होते.

Shikhar Dhawan Divorce : शिखर धवन याचा पत्नी आयशा हिच्याशी घटस्फोट; असं काय घडलं दोघात?
Shikhar Dhawan Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 7:02 AM

नवी दिल्ली | 5 ऑक्टोबर 2023 : टीम इंडियाचा स्टार खेळाडू शिओखर धवनच्या आयुष्याला कलाटणी देणारी बातमी आहे. शिखर धवनचा पत्नी आयशा मुखर्जीसोबत घटस्फोट (Shikhar Dhawan Divorce with Wife Ayesha Mukherjee ) झाला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस परिसरातील फॅमिली कोर्टाने या दोघांच्याही घटस्फोटाला परवानगी दिली आहे. आयशाने शिखरला मुलापासून दूर ठेवून शिखरला मानसिक त्रास दिल्याचंही कोर्टाने मान्य केलं आहे.

फॅमिली कोर्टाचे वकील हरीश कुमार यांनी यांनी घटस्फोटाच्या याचिकेत शिखर धवनने पत्नी आयशावर लावलेले सर्व आरोप स्वीकारले आहेत. आयशाने या आरोपांचा विरोध केला नाही. किंवा ती या आरोपापासून स्वत:चा बचाव करण्यात कमी पडली आहे, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

पत्नीकडून मानसिक छळ

शिखरने या घटस्फोटाच्या याचिकेत आयशावर गंभीर आरोप केले होते. पत्नीने आपला मानसिक छळ केला असल्याचा आरोप शिखरने याचिकेत केला होता. दरम्यान, कोर्टाने मुलाच्या ताब्याबाबत कोणताही  स्पष्ट आदेश पारित केला नाही. मुलगा कुणाकडे राहणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही. सध्या मुलगा आयशाकडे आहे. त्यामुळे कोर्टाने शिखरला मुलाला भेटण्याची परवानगी दिली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात उचित वेळेत मुलाशी व्हिडीओ कॉलवर बोलण्याची परवनागी शिखरला देण्यात आली आहे. तसेच शाळांच्या सुट्ट्यांमध्ये कमीत कमी काळासाठी मुलाला शिखरसोबत आणि शिखरच्या कुटुंबीयांसोबत रात्रभर राहण्यासाठी आणि त्यांच्या भेटीसाठी भारतात आणण्याचा आदेशही कोर्टाने आयशाला दिला आहे.

बाप म्हणून अधिकार

शिखर धवन हा प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. एक नागरिक आणि बाप म्हणून त्यांचेही काही अधिकार आहेत, असं कोर्टाने म्हटलंय. कोर्टाला मुलाच्या बापाचे आणि कुटुंबाच्या सान्निध्याच्या अधिकाराचंही भान आहे. दरम्यान, शिखर धवनला वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात स्थान मिळालेलं नाही. सध्या तरी क्रिकेट जगतात त्याचा सिक्का चालताना दिसत नाहीये. संघात स्थान मिळावं म्हणून त्याला संघर्ष करावा लागत आहे.

आयशा 10 वर्षाने मोठी

शिखर धवन आणि आयशा यांनी 2012मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर दोघांना एक मुलगा झाला. त्याचं नाव जोरावर आहे. आयशा शिखरपेक्षा 10 वर्षाने मोठी आहे. मात्र, आता तब्बल 11 वर्षाच्या संसारानंतर दोघांचा घटस्फोट झाला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.