Madhya pradesh : दोन समाजात तुफान हाणामारी, घटनेत एकाचा मृत्यू, आरोपींच्या घरावर प्रशासनाचा बुलडोझर, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
मध्य प्रदेश राज्यातील रायसेना जिल्ह्यातील सिलवानी तालुक्याच्या खमरिया गावात शनिवारी दोन समुदायांमध्ये हाणामारीची घटना घडली. काही वेळात हाणामारीचं प्रकरण तापलं. दोन समाजातील लोकांमध्ये झालल्या हाणामारीत एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची घटना घडलीय. यामुळे मध्य प्रदेशातील वातावरण तापलंय.
मध्य प्रदेश : राज्यातील रायसेना जिल्ह्यातील सिलवानीच्या खमरिया गावात शनिवारी दोन समुदायांमध्ये तुफान हाणामारीची घटना घडली. काही वेळात हाणामारीचं प्रकरण मध्य प्रदेशात (Madhya pradesh)तापलं. दोन समाजातील लोकांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू (death) तर अनेक जण जखमी झाल्याची घटना घडलीय. यामुळे मध्य प्रदेशातील वातावरण तापलंय. जखमींना भोपाळ (Bhopal) येथील हमीदिया रुग्णालयात नेण्यात आलंय. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (CM shivraj chauhan)यांनी जखमींच्या प्रकृतीची रुग्णालयात येऊन विचारपूस केली. दुसरीकडे प्रशासनाने घर आणि दुकानांवर बुलडोझर चालवून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मध्य प्रदेशात हे प्रकरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दोन समाजात तेढ निर्माण झाल्याने काहीकाळ याठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तर सिलवानी तालुक्यातील खमरिया गावात पोलिसांचा कडक बंदोबस्त अद्यापही आहे.
50 हून अधिक जखमी
दोन समाजातील वादातून वाहने आणि घरे जाळण्यात आली असल्याची माहिती आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणात दगडफेक देखील घटनास्थळी झाली. या घटनेत 50 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळतेय. जखमींना सिलवानी आणि उदयपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काहींना भोपाळ येथील हमीदिया रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
तणाव वाढताच बंदोबस्त
रायसेना जिल्ह्यातील सिलवानी तालुक्याच्या खमरिया गावात शनिवारी दोन समुदायांमध्ये हाणामारीची घटना घडली. यानंतर तणाव वाढला. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. रात्री उशिरा एका जखमीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शनिवारी कारवाई करत प्रशासनाने आरोपींची चार घरे बुलडोझरनं जमीनदोस्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली जखमींची भेट
घटनेची माहिती मिळताच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घटनास्थळी जाऊन जखमींची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं की, मृत राजू आदिवासीच्या कुटुंबाला 5 लाख रुपये देण्यात येईल आणि गंभीर जखमी हरी सिंह आणि रामजीभाई यांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत दिली जाईल. इतर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने जाहीर केलीय आहे.
इतर बातम्या