मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 42 टक्के मंत्र्यांवर गंभीर गुन्हे, तर 90 टक्के कोट्याधीश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करत 36 जणांचा समावेश केला. मात्र, मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळातील 42 टक्के मंत्र्यांवर गंभीर गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करत 36 जणांचा समावेश केला. मात्र, मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळातील 42 टक्के मंत्र्यांवर गंभीर गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय. असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्स (ADR) या संस्थेने याबाबत अहवाल जाहीर केलाय. यात मंत्रिमंडळातील 90 टक्के मंत्री कोट्याधीश असल्याचंही नमूद करण्यात आलंय. हा अहवाल जाहीर झाल्यानंतर देशभरात यावरुन चर्चेला उधाण आलंय (Criminal cases register against 42 percent ministers of new Modi Cabinet).
असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्स (ADR) या संस्थेच्या अहवाला नव्या मोदी मंत्रिमंडळात 33 मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. त्यातही 24 मंत्र्यांवर गंभीर गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. इतकंच नाही तर 4 मंत्र्यांवर अगदी खुनाचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय 5 मंत्र्यांवर समाजातील सौहार्द आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे गुन्हे दाखल आहेत. 7 जणांवर निवडणूक प्रक्रियेचं उल्लंघन केल्याचा ठपका आहे.
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 42 टक्के मंत्र्यांवर गंभीर गुन्हे, तर 90 टक्के कोट्याधीशhttps://t.co/KDtkiwkt78#ADR #ModiCabinet #Democracy pic.twitter.com/qnLyIczIk5
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ??✊ (@PravinSindhu) July 11, 2021
90 टक्के मंत्री कोट्याधीश
मोदी मंत्रिमंडळातील 90 टक्के मंत्री हे कोट्याधीश आहेत. या मंत्र्यांची सरासरी संपत्ती तब्बल 16.24 कोटी इतकी आहे. 4 जणांनी तर आपली संपत्ती 50 कोटींपेक्षा अधिक असल्याचं जाहीर केलंय.
हेही वाचा :
‘कामगिरीच्या आधारावर खरं तर पंतप्रधानांनी पायउतार व्हावं’, मंत्रिमंडळ विस्तारावरुन काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना टोला
VIDEO: कोण म्हणतं मुंडे भगिनी नाराज आहेत?, उगाच बदनामी करू नका; देवेंद्र फडणवीस भडकले
‘कोण कुणाला अंगावर घेतं बघू’, नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर शिवसेनेचं आव्हान
व्हिडीओ पाहा :
Criminal cases register against 42 percent ministers of new Modi Cabinet