पंजाबमधील गुन्हेगारी टोळ्या आणि दहशतवाद्यांचे कनेक्शन, राष्ट्रीय तपास यंत्रणांची 50 ठिकाणी छापेमारी
पंजाबमधील गुन्हेगारी टोळ्या आणि दहशतवाद्यांचे संबंध उघड, वाचा सविस्तर
नवी दिल्ली- राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आज देशात 50 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापेमारी केली आहे. ही कारवाई पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Moosewala murder case)याच्या हत्येप्रकरणात करण्यात आलेली नाही, तो एनआयएच्या तपासाचा भाग नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई पंजाबमधील गुन्हेगारी टोळ्या आणि दहशतवादी संघटना (terrorist)यातील असलेल्या संबंधांप्रकरणी मारण्यात आली आहे. हे छापे दि्लली, पंजाब, हरियाणा आणि इतर राज्यांत टाकण्यात आल्या. यात काही गुन्हेगारी टोळ्यांतील सदस्य आणि संशयित दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर या धाडी करण्यात आल्याची माहिती आहे.
CLARIFICATION | NIA is conducting searches today at 50 places across North India relating to investigation of cases against activities of gangsters having serious int’l & inter-state ramifications. Case of Sidhu Moosewala murder is not under investigation by NIA: Official sources
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) September 12, 2022
सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी या प्रकरणात पंजाबमधील टोळ्या आणि पाकिस्तानातून संचलित करण्यात येत असलेल्या दशतवादी संघटनांचा संबंध असू शकतो, असे विधान केले होते. त्यावेळीसच ही कारवाी एनआयएकडून करण्यात आलेली आहे.
मुसेवाला हत्या प्रकरणात आत्तापर्यंत २३ जणांना अटक करण्यात आलेली आहे. गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांच्या मदतीने आणखी तीन संशयितांना अटक करण्यात आली होती. दिल्लीच्या स्पेशल सेलने युएपीएच्या विविध कलमांनुसार लॉरेन्स बिष्णोई गँग, बबिहा गँग आणि नीरज बवाना गँगच्या १० गँगस्टर्सविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
या प्रकरणात दहशतवाद्यांचा संबंध समोर आल्याने आता या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणाही उतरली असून, त्यांनी तपासासाठी ही छापेमारी केल्याचे सांगण्यात येते आहे. यातील नीरज बवाना गँगमधील काही जण हे चर्चित लोकांच्या हत्या आणि सोशल मीडियावर दहशत पसरवण्याच्या प्रकरणात सामील आहेत. नीरज बवाना आणि लॉरेन्स बिष्णोई गँगमध्ये सध्या वॉर सुरु आहे. सिद्धु मुसेवाला याच्या हत्येनंतर नीरज बावाना गँगने मुसेवालाच्या हत्येचा बदला घेणार असल्याचे आणि बिष्णोई गँगला धडा शिकवणार असल्याचे वक्तव्य केले होते.
याच सगळ्या संबंधात एनआयएकडून कारवाई करण्यात येते आहे. देश-विदेशात जेलमधून राहून गँग चालवणारे गँगस्टर्स हे सध्या त्यांच्या टार्गेटवर आहेत. दिल्लीच्या स्पेशल सेलला ही माहिती मिळाली आहे की लॉरेन्स बिष्णोई, विक्रम ब्रार, जग्गू भगवानपुरिया, संदीप, सचिन थापन आणि अनमोल बिष्णोई हे कॅनडा, पाकिस्तान आणि दुबईतील वेगवेगळ्या जेलमध्ये राहून बाहेर गँग चालवीत आहेत. एफआयआरमध्ये हेही नमूद करण्यात आले आहे की, लॉरेन्स बिष्णोई हा खलिस्तानी दहशतवादी हरविंदरसिंह रिंडा याचा नीकटवर्तीय आहे. जो सध्या पाकिस्तानात असण्याची शक्यता आहे.