जमावाने ड्रायव्हरला जिवंत जाळले, पिकअप व्हॅनने लहानगीला चिरडले, संतप्त जमावाने गाडीला लावली आग, ड्रायव्हरलाही आगीत फेकले
अपघातानंतर संतप्त जमावाने आधी या गाडीच्या मागे आग लावली. त्यानंतर सुमारे ८ ते १० तरुण ड्रायव्हरला बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसते आहे. अत्यंत क्रूरपणे, लाथाबुक्क्यांनी या ड्रायव्हरला बेदम मारहाण करणारा हा व्हिडिओ आहे.
आलीराजपूर, मध्यप्रदेश (Madhya Pradesh) – एका पिकअप व्हॅनने ८ वर्षांच्या मुलीला चिरडल्यानंतर (girl dead in accident), संतापलेल्या जमावाने (angry crowd)ड्रायव्हरला जिवंत जाळल्याची (driver burnt alive )घटना उघडकीस आली आहे. या अपघातानंतर घटनास्थळीच या लहानगीचा मृत्यू झाला. संतापलेल्या जमावाने ड्रायव्हरला बेदम मारहाण केली, आणि त्याच्या पिकअप व्हॅनला आग लावून दिली. इतक्यावरच लोकांचा संताप थांबला नाही, त्यांनी त्या ड्रायव्हरलाही त्या आगीत फेकले. या आगीत होरपळलेल्या ड्रायव्हरचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात संतप्त जमाव ड्रायव्हरला मारहाण करताना आणि त्याच्या गाडीला आग लावताना दिसतो आहे.
काय आहे व्हिडिओत
व्हिडिओत जळणारी गाडी दिसते आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने आधी या गाडीच्या मागे आग लावली. त्यानंतर सुमारे ८ ते १० तरुण ड्रायव्हरला बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडिओत दिसते आहे. अत्यंत क्रूरपणे, लाथाबुक्क्यांनी या ड्रायव्हरला बेदम मारहाण करणारा हा व्हिडिओ आहे.
घरात एकटा कमवता होता ड्रायव्हर
या मृत ड्रायव्हरचे नाव मगन सिंह असे असून, तो जामनली जोबटचा रहिवासी होता. आगीतून होरपळून निघालेल्या मगन याला नंतर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्याची गंभीर परिस्थिती पाहता त्याला गुजरातच्या दाहोद येथे पाठवण्यात आले. तिथे उपचारादम्यान मगन सिंह याचा मृत्यू झाला. मगन सिंह याचा मोठा परिवार आहे. पत्नी, तीन मुले आणि म्हातारे आई–वडील असा त्याचा परिवार आहे. घरात तो एकटाच कमवता होता.
नेमका काय घडला प्रकार
शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास छोटी पोल या गावात पिकअप व्हॅनने मुलीला चिरडले. यात या मुलीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावाने ड्रायव्हरला गाडीतून बाहेर काढून मारहाण केली. त्यानंतर गाडीला आग लावण्यात आली. त्यात तयालाही फेकण्यात आले. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहचले, तेव्हा परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणात चौकशी सुरु असून, दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.