VIDEO | शहीद साथीदाराच्या बहिणीचं लग्न, जवानांनी निभावलं भावाचं कर्तव्य, हृदय हेलावणारा लग्नातील क्षण!
दर महिन्यातून दोन ते तीन वेळा देशामध्ये जवान शहीद झालेल्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची वाताहत होते. CRPF चे जवान शैलेंद्र प्रताप सिंह हे गेल्या वर्षी शहीद झाले. मात्र, शहीद शैलेंद्र प्रताप सिंह यांच्या बहिणीच्या लग्नात मंडप धारण करण्याच्या कार्यक्रमाला काही जवान त्यांच्या गणवेशामध्ये उपस्थित राहिले.
मुंबई : दर महिन्यातून दोन ते तीन वेळा देशामध्ये जवान शहीद झालेल्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतात. जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची वाताहत होते. CRPF चे जवान शैलेंद्र प्रताप सिंह हे गेल्या वर्षी शहीद झाले. मात्र, शहीद जवान शैलेंद्र प्रताप सिंह (Shailendra Pratap Singh) यांच्या बहिणीच्या लग्नात मंडप धारण करण्याच्या कार्यक्रमाला काही जवान त्यांच्या गणवेशामध्ये उपस्थित राहिले.
रायबरेलीतील शैलेंद्र सिंह यांच्या घरी फोर्स जवानांचा ताफा पोहोचताच विवाह सोहळ्यात उपस्थित असलेले लोक भावूक झाले. नवरी फेर्याला जात असताना सीआरपीएफ जवानांनी मंडपाची चुनरी पकडली आणि हे पाहून अनेकांचे डोळे भरून आले. यातून या जवानांनी समाजा पुढे एक नवा आदर्शच घालून दिला.
जम्मू-काश्मीरमध्ये शैलेंद्र प्रताप सिंह शहीद झाले होते
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शैलेंद्र प्रताप सिंह शहीद झाले. 2008 मध्ये CRPF मध्ये रुजू झालेले शैलेंद्र प्रताप हे दलाच्या 110 व्या बटालियनमध्ये तैनात होते. त्यांची कंपनी सोपोरमध्ये होती. दहशतवाद्यांविरोधात लढताना शैलेंद्र प्रताप सिंह यांना गोळी लागली आणि त्यामध्ये त्यांना वीर मरण प्राप्त झाले होते.
View this post on Instagram
जवानांनी मंडपाची चुनरी चारी बाजूंनी धरली
शैलेंद्र प्रताप यांच्या घरी त्यांचे वडील नरेंद्र बहादूर सिंह, आई सिया दुलारी सिंह, पत्नी चांदनी, बहिणी शीला, प्रीती, ज्योती या असतात. शैलेंद्र प्रताप सिंह यांना नऊ वर्षांचा मुलगा कुशाग्र आहे. शैलेंद्र सिंह यांच्या बहिणीचे लग्न असल्याचे त्यांच्या सहकार्यांना समजले असता जवान लग्नात अचानक पोहोचले तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला.
विवाह सोहळ्यातील जवानांना पाहून शैलेंद्रच्या कुटुंबीयांचे डोळे भरून आले. मंडप रोखण्याची वेळ आली तेव्हा सीआरपीएफचे जवान पुढे आले. विशेष म्हणजे हे जवान फक्त लग्नात सामिल झालेच नाही तर त्यांनी शैलेंद्रच्या बहिणीची (नवरीची) मंडपाची चुनरी चारी बाजूंनी धरली. शैलेंद्रची बहीण नवरीच्या वेशात मंडपाखाली पोहोचली तेव्हा वातावरण भावूक झाले.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!