Cyclone Alert : ओडिशा-आंध्रच्या अडचणीत होणार वाढ; चक्रीवादळ उत्तरेकडील किनारपट्टीच्या राज्यांना धडकू शकतं, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला

9 मेपासून समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटांमुळे मच्छिमारांनी तेथे जाऊ नये. चक्रीवादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग 80-90 किमी प्रतितास असेल असा आमचा अंदाज आहे. जेना म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले असून आवश्यक ती पावले उचलण्यास सांगितले आहे.

Cyclone Alert : ओडिशा-आंध्रच्या अडचणीत होणार वाढ; चक्रीवादळ उत्तरेकडील किनारपट्टीच्या राज्यांना धडकू शकतं, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला
चक्रीवादळ Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 3:44 PM

Cyclone Alert : दक्षिण अंदमान (South Andaman) समुद्रावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळ अधीक तीव्र होऊ शकतं. तर ते पुढील आठवड्याच्या सुरुवातीला आंध्र प्रदेश-ओडिशा किनारपट्टीवर पोहोचण्याची दाट शक्यता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हवामान खात्याने (IMD) म्हटले आहे की, हवामान प्रणाली उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची आणि दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरावर शनिवारपर्यंत दाब क्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. रविवारी सायंकाळपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. हवामान कार्यालयाने चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात मंगळवार ते शुक्रवार या कालावधीत पश्चिम बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये ढगांचा गडगडाटासह मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा दिला आहे.

या भागात चक्री वादळे आली

ओडिशा सरकारच्या म्हणण्यानुसार, हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन विभागाला सज्ज राहण्यास सांगितले आहे. गेल्या तीन्हीही उन्हाळ्यात या भागात चक्री वादळे आली होती. ओडिशात 2021 मध्ये यास, 2020 मध्ये अम्फान आणि 2019 मध्ये फानी अशी चर्कीवादळे आली होती. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-पश्चिम दिशेने सरकत असून आग्नेय बंगालच्या उपसागरातील दाब क्षेत्रात आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात चक्री वादळात रुपांतरित होण्याची शक्यता आहे. 10 मे पर्यंत ते किनाऱ्यावर पोहोचू शकते.

एनडीआरएफच्या 17 तुकड्या आणि अग्निशमन विभागाच्या 175 तुकड्या

तसेच महापात्रा म्हणाले, ‘आम्ही अजून हे सांगू शकत नाही की हे चक्रीवादळ कोठे धडकेल. तर आम्ही वाऱ्याच्या संभाव्य वेगाचाही उल्लेख केलेला नाही.” ओडिशाचे विशेष मदत आयुक्त (एसआरसी) पी.के. जेना म्हणाले की, “आम्ही एनडीआरएफ (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स), ओडीआरएएफ (ओडिशा डिझास्टर रॅपिड रिस्पॉन्स फोर्स) च्या 17 टीम आणि अग्निशमन विभागाच्या 175 टीम्सना पाचारण केले आहे. त्याचबरोबर एनडीआरएफ अधिकाऱ्यांकडून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी आणखी 10 टीम्सना सज्ज राहण्यास सांगावे अशी विनंती केली आली आहे. तर आएएमडी चे वरिष्ठ वैज्ञानिक उमाशंकर दास यांनी सांगितले आहे की, जगतसिंहपूर, गंजम आणि खोरधा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल. तर ओडिशा च्या किनारी भागांत कमी ते मध्यम प्रकारचा पाऊस पडेल.

हे सुद्धा वाचा

मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला

जेना म्हणाले की, भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाला समुद्रातील मच्छिमारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सतर्क राहण्यास सांगितले आहे. महापात्रा म्हणाले, ‘आयएमडी चक्रीवादळ, वाऱ्याचा वेग, धडकण्याचे ठिकाण याची माहिती 7 मे रोजी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतरच देऊ शकते. 9 मेपासून समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटांमुळे मच्छिमारांनी तेथे जाऊ नये. चक्रीवादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग 80-90 किमी प्रतितास असेल असा आमचा अंदाज आहे. जेना म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले असून आवश्यक ती पावले उचलण्यास सांगितले आहे. तर अग्निशमन विभागाचे महानिदेशक यांनी विभागातील सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या या दद्द करण्यात आल्या आहेत.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.