नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरावरील (Bay of Bengal) बदलत्या वातावरणीय स्थितीमुळं चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन 2022 मधील पहिलं असानी चक्रीवादळ (Asani Cyclone) निर्माण होण्याची शक्यता आहे. असानी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अंदमान आणि निकोबारमधील (Anadaman Nikobar) नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या शक्यतेमुळं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. चेन्नई आणि विशाखापट्टणम ते अंदमान निकोबार यांच्यातील सेवा इंटर आयलँड शिपींग सर्व्हिसेस सेवा बंद ठेवण्यातआल्या आहेत. तर, मच्छीमारांना सुमद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
असानी वादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचं 150 जवानांचं पथक तैनात करण्यात आल्याचं आहे. नागरिकांच्या मदतीसाठी सहा कॅम्प तयार करण्यात आले आहेत. पोर्टब्लेअरमध्ये 68 जवानांची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. तर दिगलीपूर, रगंत, हुतबै येथे 25 जवानांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. उत्तर आणि मध्यम अंदमान आणि दक्षिण अंदमान जिल्ह्यासह पोर्ट ब्लेअरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरामधील दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. निकोबारपासून 110 किमी जवळ कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, असानी चक्रीवादळ निर्माण झाल्यानंतर ते म्यानमार आणि बांग्लादेशकडे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळामुळं अंदमान निकोबारमधील शाळा बंद ठेवण्यत आलेल्या आहेत.
Cyclone Asani to intensify into a deep depression during next 24 hours
Read @ANI Story | https://t.co/K2NlHmHy8p#CycloneAsani pic.twitter.com/4jx7nw9D0H
— ANI Digital (@ani_digital) March 20, 2022
केंद्रीय गृहमंत्रालयानं अधिकृत नोटिफिकेशन काढून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक म्हणजेच एनडीआरएफला पोर्ट ब्लेअरला तैनात करण्याचे आदेश दिल्याप्रमाणं एनडीआरएफनं पथकं तैनात केली आहेत. अंदमान निकोबार येथील नागरिकांचं संरक्षण, पायाभूत सुविधांचं पुनर्निमाण करण्याची जबाबदारी एनडीआरएफवर आहे. अंदमान निकोकबारमधील मासेमारी, पर्यटन आणि जहाज वाहतूक बंद करण्यात आली आहे. इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, एअर फोर्स आणि इंडियन कोस्ट गार्डला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय यंत्रणांना अंदमान आणि निकोबारमधील प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यंदाचं हे पहिलं चक्रीवादळ 21 मार्च रोजी निर्माण होईल. आयएमडीनं केलेल्या ट्विटच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावरील बदलत्या वातावरणीय स्थितीमुळं असानी चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या :