cyclone dana : चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता NDRF, तटरक्षक दल, सरकारी यंत्रणा हाय अलर्टवर
चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), तटरक्षक दल आणि सर्व संबंधित सरकारी यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे
दाना चक्रीवादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये धडकणार आहे. याबाबत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग IMD ने इशारा दिलाय की, चक्रीवादळ दाना गुरुवार, 24 ऑक्टोबर रोजी किनारपट्टीवर धडकणार आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये दिसून येणार आहे. चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने सांगितले की, दाना नावाचे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकेल आणि 24 ऑक्टोबरपर्यंत किनारपट्टीवर पोहोचेल. IMD ने ओडिशा आणि पश्चिम बंगाल तसेच देशातील इतर अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा जारी केला आहे.
दाना किती धोकादायक आहे?
दाना चक्रीवादळामुळे पुरी, भद्रक, केंद्रपारा, जगतसिंगपूर आणि कटकमध्ये 100 ते 110 किमी प्रति तास वाऱ्याचा वेग येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने बुधवारी पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर, पश्चिम मिदनापूर, दक्षिण 24 परगना आणि उत्तर 24 परगणा या किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पारादीप आणि हल्दिया बंदरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट
ओडिशातील भद्रक, बालासोर, जाजपूर, केंद्रपारा, कटक, जगतसिंगपूर, रायगडा, गजपती, गंजम, कंधमाल, नयागड, रितिकसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याच वेळी, हवामान खात्याने असेही म्हटले आहे की कोलकाता, हावडा, हुगली, उत्तर 24 परगणा, पुरुलिया आणि बांकुरा जिल्ह्यात 23, 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 23 ऑक्टोबरपासून ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांच्या किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर प्रतितास असेल. नंतर 24 ऑक्टोबरच्या रात्रीपासून ते 25 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत तो 120 किलोमीटर प्रतितास होईल.
आयएमडीचे महासंचालक यांनी सांगितले की, वादळ येण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 23 ऑक्टोबरपासून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. 24-25 ऑक्टोबर रोजी ओडिशा व बंगालच्या किनारपट्टी भागात काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी 30 सेमीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.