Dancing Cop : रखरखत्या उन्हात कचरावेचणाऱ्या मुलांना डान्सिंग कॉपचा आधार; ठेवले कॉपच्या पायावर पाय

दोन मुले वेगाने धावत रस्ता ओलांडताना दिसली. मी त्यांना थांबवल्यावर एका मुलाने मला सांगितले की, त्याचे पाय जळत आहेत. मी म्हणालो की तू माझ्या बुटावर पाय ठेव. त्यावेळी सुमारे 30 सेकंद माझ्या शूजवर पाय ठेवून तो मुलगा उभा होता.

Dancing Cop : रखरखत्या उन्हात कचरावेचणाऱ्या मुलांना डान्सिंग कॉपचा आधार; ठेवले कॉपच्या पायावर पाय
डान्सिंग कॉप Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 5:44 PM

इंदौर : रणजीत सिंग हे इंदौरच्या वाहतूक पोलिसात (Traffic Police) हवालदार आहेत. सोशल मीडियावर लोक त्यांना डान्सिंग कॉप (Dancing Cop Ranjit Singh) म्हणूनही ओळखतात. या नावामागील कारण म्हणजे ते नृत्याद्वारे वाहतूक नियंत्रित करतात. सोशल मीडियावर रणजीत सिंगच्या डान्सचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. तर ते सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण त्याच्या डान्समुळे नाही तर एका उदात्त कारणामुळे. आणि या कामासाठी लोक सोशल मीडियावर (Social Media) रणजित सिंग यांचे जोरदार कौतुक करत आहेत. त्यांच्यालर प्रेमाचा वर्षावर करत आहेत. तर त्यांच्या या कार्याला सलाम करताना सोशल मिडीयावर अनेक ते फोटो शेअर ही करत आहे.

कार्याला सलाम

त्यांच्या या कार्याला सलाम करताना एका ट्विटर यूजर म्हटले आहे की, हे चित्र मध्य प्रदेशातील इंदौर शहराचे आहे. छायाचित्रात दिसत असलेल्या पोलिसाचे नाव ‘रणजीत सिंह’ आहे. दोन मुले रस्ता ओलांडत होती, मात्र सिग्नल सुरू असल्याने ती थांबली होती. रस्ता इतका गरम होता की अनवाणी असलेल्या मुलाचे पायांचा चटके बसत होते. त्यावेळी ती मुलं म्हणाली, ‘साहेब पाय जळत आहेत, रस्ता क्रॉस करवून द्या’. त्यावेळी अनवाणी असलेल्या मुलाला रणजीत सिंग म्हणाले- ‘अता तर वाहतुक सुरू आहे. तु एक काम कर वाहतूक थांबेपर्यंत माझ्या पायांवर पाय ठेव.” मुलानेही तसेच केले. एवढेच नाही तर वाहतूक पोलिस रणजित सिंह यांनी मुलाला चप्पलही खरेदी करून दिले.

इंदौर शहरातील हायकोर्ट चौकातील घटना

दरम्यान व्हायरल होणाऱ्या फोटोच्या मागे नक्की काय खरे आहे हे जाणून घेण्यासाठी रणजित सिंग यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी त्यांनी सांगितले, ही घटना दोन दिवसांपुर्वीची (19 मे) इंदौर शहरातील हायकोर्ट चौकातील आहे. त्यावेळी दुपारचे 12 वाजले असतील. त्यावेळी दोन मुले वेगाने धावत रस्ता ओलांडताना दिसली. मी त्यांना थांबवल्यावर एका मुलाने मला सांगितले की, त्याचे पाय जळत आहेत. मी म्हणालो की तू माझ्या बुटावर पाय ठेव. त्यावेळी सुमारे 30 सेकंद माझ्या शूजवर पाय ठेवून तो मुलगा उभा होता. यादरम्यान कोणीतरी फोटो काढून व्हायरल केला. मी मुलाला त्याचे नाव विचारले. आणि पायात चप्पल नसण्याचे कारण ही. त्यावर त्याने आपले नाव लकी सांगितले. तर मुलाने सांगितले की, आम्हा दोघांना एकच चप्पल आहे. मी ते काही काळ घालतो, नंतर थोड्या वेळाने माझा मित्र ते घालतो.”

चप्पल खरेदी केले

यानंतर रणजीतने आपल्या सपोर्टिंग स्टाफच्या मदतीने मुलासाठी चप्पल खरेदी केले. या घटनेबाबत अधिक माहिती देताना रणजीत म्हणाले, “दोन्ही मुलांना त्यांच्या वयाबद्दल आणि पालकांबद्दल काहीही माहिती नव्हते. दोघींचे घाणेरडे कपडे पाहून मी विचारले की घाणेरडे कपडे का घातले आहेस? तू अंघोळ करत नाहीस का? त्यानंतर मुलांनी फक्त एक जोड कपडे असल्याचे सांगितले. आज दोन्ही मुलांसाठी कपडे आणले आहेत, पण फोटो वगैरे काढले नाहीत. शेवटी अनेक महिन्यांनी कपडे मिळाल्याने मुलांनी अंघोळ केली. तर कपडे नसलल्याने ते अजिबात आंघोळ ही करत नव्हते.

लोक करत आहेत सलाम

सोशल मीडियावर लोक सतत रणजित सिंगच्या या स्तुत्य कामाचे कौतुक करत आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले की, “जे मंदिरे, मशिदींमध्ये धर्म शोधत आहेत त्यांनी हे पहावे. हाच खरा धर्म आहे. मानवाने मंदिरे, मशिदी, मूर्ती, प्रतीके बनवली आहेत. देवाने मनुष्य निर्माण केला आहे. तुम्ही लोक गोष्टींसाठी माणसांना मारत आहात. या पोलीस कर्मचाऱ्याने सुद्धा या दोन मुलांचा धर्म आणि जात विचारली नसेल, कारण त्यांच्या कामात धार्म आडवा येत नसवा.

खरंच, रणजित सिंगने जे केले त्याबद्दल ते कौतुकास पात्र आहे. तसेच या मुलांच्या अवस्थेला जबाबदार कोण हेही कळायला हवे. या मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारीही सरकारने उचलली पाहिजे जेणेकरून त्यांच्या हातात कचऱ्याची पोती नसून पेन आणि पुस्तक असेल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.