Marathi News National Dangerous landing of helicopter in Kedarnath, collided with the ground while landing on helipad, 270 degree turn, fortunately no casualties
VIDEO केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचे धोकादायक लँडिंग, हेलिपॅडवर उतरताना जमिनीवर आदळले, 270 डिग्रीचा टर्न, सुदैवाने जीवीतहानी नाही
व्हिडिओत ते स्पष्टपणे दिसते आहे की जमिनीवर आदळल्यानंतर हेलिकॉप्टर 270 अंशांत घसरले. अत्यंत धोकादायक पद्धतीने हेलिकॉप्टरचे लँडिंग झाले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, पायलटनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
देहराडून – केदारनाथ यात्रेत एक मोठा अपघात होता होता टळला. थम्बी एव्हिएशनचे एक हेलिकॉप्टर केदारनाथच्या हेलिपॉडवर लड करत होते. त्यावेळी अचानकपणे हेलिकॉप्टर जमिनीवर आदळले, त्यावेळी हेलिॉकॉप्टरने जोरात वळणही घेतले. सुदैवाने या प्रकारात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने सांगितले की, ही घटना 31 मे रोजी घडली. हेलिकॉप्टर जेव्हा लँड करत होते, तेव्हा ते जमिनीवर आदळले. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. व्हिडिओत ते स्पष्टपणे दिसते आहे की जमिनीवर आदळल्यानंतर हेलिकॉप्टर 270 अंशांत घसरले. अत्यंत धोकादायक पद्धतीने हेलिकॉप्टरचे लँडिंग झाले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, पायलटनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
पाहा हा व्हिडीओ
#WATCH A helicopter belonging to a private aviation company while landing at Kedarnath helipad had an uncontrolled hard landing on 31st May; no passengers were injured in the incident#Uttarakhandpic.twitter.com/4yskr0aoz5
केदारनाथच्या बर्फात गर्दी असलेल्या ठिकाणी हेलिपॅडवर हेलिकॉप्टर लँड होतानाचा हा व्हिडीओ आहे. त्यात हेलिकॉप्टर उतरताना जमिनीवर आपटल्याचे आणि त्यानंतर गतीने वळण घेतल्याचे स्पष्ट दिसते आहे. वेळीच हेलिकॉप्टरवर नियंत्रण मिळवता आले नसते, तर त्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट जाणवते आहे.
परिस्थिती योग्य नसेल तर लँडिंग टाळा, डीजीसीएचे आदेश
डीजीसीएने या प्रकरणात सूचना जारी केल्या आहेत. त्यात केदारमध्ये हेलिकॉप्टर लँडिंग करताना पायलट्सनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. जर क्रॉसविंड आमि टेलविंड जर अपेक्षेपेक्षा जास्त असेल तर विशएष सावधगिरी बाळगण्याचे सांगण्यात आले आहे. जर लँडिंग शक्य नसेल तर बेसवर परतण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
रविवारी चारधाम यात्रेला जाणाऱ्या बसला अपघात, 26 जणांचा मृत्यू
उत्तरकाशीमध्ये रविवारी संध्याकाळी बस दरीत कोसळल्याने, मध्यप्रदेशातील 26 यात्रेकरुंचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये 30 प्रवासी होते. यातील 25 जण हे मध्य प्रदेशातील रहिवासी होते.