Kanpur Murder : 20 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी सुनेची हत्या?; पोलीस अधिकाऱ्याला मुलासह अटक

दीक्षाच्या मृत्यूनंतर कानपूरला पोहोचलेल्या तिच्या कुटुंबियांनी पोलीस इन्स्पेक्टर सिंह आणि त्यांच्या कुटुंबियांवर दीक्षाची हत्या केल्याचा आरोप करत गोंधळ सुरू केला. अखेर पोलिसांनी हुंड्यासाठी सुनेची हत्या केल्याच्या आरोपावरून इन्स्पेक्टर अरुण सिंह, त्यांचा मुलगा आदर्श सिंह यांच्यासह पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला.

Kanpur Murder : 20 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी सुनेची हत्या?; पोलीस अधिकाऱ्याला मुलासह अटक
साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 3:19 PM

कानपूर : हुंड्यासारख्या जाचक प्रथेवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. यातून महिलांचे हकनाक बळी जात असल्याची गंभीर दखल घेत सरकार आणि न्यायालयांकडून हुंड्याच्या प्रथेवर कायद्याचा बडगा उगारला गेला. मात्र हुंडा (Dowry) मागण्याचे सत्र अजून पूर्णपणे थांबलेले नाही. उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडलेल्या घटनेने हुंड्याचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. कानपूरमध्ये एका महिलेची सासरच्या लोकांनी 20 लाख रुपयांसाठी निर्घृण हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी एका पोलिस अधिकाऱ्याला आणि त्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. या दोघांवर हुंड्यासाठी सुनेची हत्या केल्याचा आरोप आहे. (Daughter killed for Rs 20 lakh dowry in Kanpur, Police officer arrested with son)

पोलिस अधिकाऱ्यानेच सुनेची हत्या केल्याने खळबळ

कानपूरचे रहिवासी असलेले पोलिस इन्स्पेक्टर अरुण सिंह हे सध्या औरैयामध्ये तैनात आहेत. 22 डिसेंबर 2020 रोजी त्यांचा मुलगा आदर्श सिंहचा विवाह दीक्षा सिंहसोबत झाला होता. कासगंजमध्ये दीक्षाच्या कुटुंबियांचा व्यवसाय आहे. दीक्षाच्या कुटुंबियांनी तिचे मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. त्यासाठी 40 लाख रुपये खर्च केले होते. असे असतानाही पोलीस इन्स्पेक्टर सिंह यांचे कुटुंबिय दीक्षाच्या कुटुंबियांकडून आणखी 20 लाख रुपयांची मागणी करत होते. याच कारणावरून पोलिस इन्स्पेक्टर अरुण सिंह यांनी सुनेची हत्या घडवून आणल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मंगळवारी दिक्षाचा घरातच संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी निळ्या रंगाच्या खुणा आढळल्या.

मृत महिलेच्या कुटुंबियांचा संताप अनावर

दीक्षाच्या मृत्यूनंतर कानपूरला पोहोचलेल्या तिच्या कुटुंबियांनी पोलीस इन्स्पेक्टर सिंह आणि त्यांच्या कुटुंबियांवर दीक्षाची हत्या केल्याचा आरोप करत गोंधळ सुरू केला. अखेर पोलिसांनी हुंड्यासाठी सुनेची हत्या केल्याच्या आरोपावरून इन्स्पेक्टर अरुण सिंह, त्यांचा मुलगा आदर्श सिंह यांच्यासह पाच जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला. त्यानंतर दीक्षाचे कुटुंबीय शांत झाले. यानंतर इन्स्पेक्टर अरुण सिंह आणि त्यांचा मुलगा आदर्श सिंहला अटक करण्यात आली. नंतर दीक्षाच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. या प्रकरणात पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे एसीपी अशोक कुमार शुक्ला यांनी दूरध्वनीवरून सांगितले.

हत्या केल्यानंतर सुनेने आत्महत्या केल्याचे भासवले!

या प्रकरणात दीक्षाच्या सासरच्या लोकांनी भूमिका सुरुवातीपासूनच संशयास्पद होती. सुरुवातीला पोलीस इन्स्पेक्टर सिंह यांनी सुनेने आत्महत्या केल्याचे सांगितले, परंतु पोलिसांना तिचा मृतदेह बेडवर आढळून आला. सुमारे 4 तासांनंतर आदर्शने दीक्षाच्या कुटुंबीयांना मृत्यूची माहिती दिली. दीक्षाच्या काकांचे म्हणणे आहे की, दिक्षाच्या सासरची मंडळी आमच्याकडून प्लॉटसाठी आणखी 20 लाख रुपये मागत होते. याच कारणावरून ते दीक्षाला सतत मारहाणही करायचे. या अनुषंगाने पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Daughter killed for Rs 20 lakh dowry in Kanpur, Police officer arrested with son)

इतर बातम्या

आधी रेकी केली नंतर व्यापाऱ्याला लुटले, नागपुरात किराणा दुकानदाराच्या बाबतीत काय घडलं?

आधी रेकी केली नंतर व्यापाऱ्याला लुटले, नागपुरात किराणा दुकानदाराच्या बाबतीत काय घडलं?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.