दहा वर्षांपूर्वीची तारीख तिच, वायनाडमध्ये माळीणची पुनरावृत्ती, आतापर्यंत 143 जणांचा मृत्यू

| Updated on: Jul 31, 2024 | 8:02 AM

Wayanad Landslide update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज वायनाडला जाणार आहे. आज दुपारनंतर राहुल गांधी प्रियंका गांधी वायनाडला जाणार आहेत. ते दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्या ठिकाणी अजूनही मदत आणि बचावकार्य सुरु आहे. तसेच अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली दबले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दहा वर्षांपूर्वीची तारीख तिच, वायनाडमध्ये माळीणची पुनरावृत्ती, आतापर्यंत 143 जणांचा मृत्यू
Wayanad Landslide
Follow us on

Wayanad Landslide: दहा वर्षांपूर्वीची घटना. 30 जुलै 2014 आता 30 जुलै 2024. जुलै महिन्याचा पाऊस आणि अख्खे गावच डोंगराखाली गडप झाले. फक्त दहा वर्षांपूर्वीची घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीणमध्ये घडली होती. त्यावेळी 175 लोकसंख्येच्या गावातील 151 जणांचा झोपेतच मृत्यू झाला होता. आता केरळमधील वायनाडगावात पावसामुळे दरड कोसळली. या घटनेत साखर झोपेतच आतापर्यंत 143 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

चार गावांना फटका

दरड कोसळणे आणि पुराचा सर्वाधिक फटका मुंडक्काई, चूरलमाला, अट्टमाला आणि नूलपुझा या चार गावांना बसला. बचावकार्यात लष्कर, नौदल, एनडीआरएफ, राज्याचे आपत्ती निवारण दल सहभागी झाले आहेत. वायनाड भूस्खलनमधील मृतांचा आकडा वाढला. आतापर्यंत 143 जणांचा मृत्यू झाला आहे. 128 जण बेपत्ता आहेत. तसेच शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. अजूनही पावसाचा जोर कायम आहे. यामुळे केरळमधील 11 जिल्ह्यांमधील शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

पुणे जिल्ह्यात घडली होती घटना

पुणे जिल्ह्यातील माळीणची पुनरावृत्ती केरळमध्ये झाली. माळीणमधील घटना सकाळपर्यंत कोणालाच माहीतसुद्धा नव्हती. त्या गावात मोबाईलचे इंटरनेट नव्हते. परंतु एका एसटी चालकास त्या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर प्रशासनाची धावधाव सुरु झाली. त्या ठिकाणी सहा दिवस मदत कार्य सुरु होते. आता केरळमध्येही साखर झोपेत असणाऱ्या 143 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत नयनरम्य ठिकाण म्हणून ओळखले जाणारे ही गावे आज उद्धवस्थ झाली आहेत. ठिकाणठिकाणी कोसळलेली दरड आणि पूरच दिसत आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेलेली वाहने अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्यांमध्ये अडकून पडली आहेत.

हे सुद्धा वाचा

राहुल गांधी आज वायनाडला जाणार

विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज वायनाडला जाणार आहे. आज दुपारनंतर राहुल गांधी प्रियंका गांधी वायनाडला जाणार आहेत. ते दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्या ठिकाणी अजूनही मदत आणि बचावकार्य सुरु आहे. तसेच अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली दबले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.