Farmers Protest: मी सरकारला घाबरत नाही, 600 शेतकऱ्यांचे बळी, सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी : राज्यपाल मलिक
नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात हरियाणात आंदोलन करणाऱ्या एका शेतकऱ्याचा पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये गंभीर जखमी झाल्यानं मृत्यू झालाय. यानंतर शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. दुसरीकडे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक ( Satya Pal Malik) यांनी देखील शेतकऱ्यांवरील क्रूर लाठीचार्जवर नाराजी व्यक्त केलीय.
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात हरियाणात आंदोलन करणाऱ्या एका शेतकऱ्याचा पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये गंभीर जखमी झाल्यानं मृत्यू झालाय. यानंतर शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. दुसरीकडे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक ( Satya Pal Malik) यांनी देखील शेतकऱ्यांवरील क्रूर लाठीचार्जवर नाराजी व्यक्त केलीय. तसेच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या माफीची मागणी केलीय. एकूणच या घटनाक्रमानंतर देशभरातून शेतकरी संघटना आक्रमक होताना दिसत आहेत.
पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झालेल्या शेतकऱ्याबाबत माहिती देताना किसान एकता मोर्चानं म्हटलं, “शेतकरी सुशील काजल (गाव रायपूर जाटान) शनिवारी (28 ऑगस्ट) बसताडा टोल प्लाजा येथे पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे रात्री उशिरा ते शहीद झाले.”
क्रूर लाठीचार्जसाठी शेतकऱ्यांची माफी मागा, राज्यपाल मलिक यांची मुख्यमंत्री खट्टर यांच्याकडे मागणी
राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले, “मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. हरियाणाचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांवर लाठीचा उपयोग करत आहेत. मी वरिष्ठ नेत्यांना शेतकऱ्यांवर बळाचा वापर न करण्यास सांगितलं. केंद्र सरकारने बळाचा उपयोग नाही केला. एसडीएम (उप-मंडळ मॅजिस्ट्रेट आयुष सिन्हा) यांना तात्काळ बरखास्त करायला हवं. ते एसडीएम पदासाठी योग्य नाही. मात्र, सरकार त्यांना पाठिंबा देत आहे.”
“मी सरकारला घाबरत नाही, 600 शेतकऱ्यांचे बळी पण सरकारकडून साधं सांत्वनही नाही”
राज्यपाल मलिक यांनी आंदोलनात मृत्यू झालेल्या कुटुंबांविषयी सरकारने संवेदना व्यक्त न केल्यानं नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “शेतकरी आंदोलन सुरू होऊन 1 वर्षे झालेय. या काळात जवळपास 600 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. मात्र, सरकारमधील कुणाकडूनही शेतकऱ्यांचं सांत्वन करणारा एक शब्द देखील आला नाही. माझ्या वक्तव्यांसाठी मी सरकारला घाबरत नाही. मला राज्यपाल पदावर प्रेम नाही. मी जे बोलतोय ते मनापासून बोलतोय. मला शेतकऱ्यांकडे परत जावं लागेल असं वाटतंय.”
‘इथं कुणीही आलं तर सरळ डोकं फोडा!’ एसडीएमचा व्हिडीओ व्हायरल
हरियाणातील एका एसडीएमचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना आंदोलकांची डोकी फोडण्याचा आदेश हे एसडीएम देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत असून त्याबाबत शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय.
करनालमध्ये पोलिसांनी जागोजागी बॅरिकेट्स लावून, दांड्या बांधून रस्ते अडवले होते. ‘ही नाकाबंदी तोडून कुणीही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मी सांगतो सरळ त्यांची डोकी फोडा. मी स्पष्ट सांगतो, डोकं फोडा. मी डेप्युटी मॅजिस्ट्रेट आहे. लिखित देतो. सरळ लाठीचार्ज करा, काही शंका? सरळ उचलून उचलून मारा. कोणतीही शंका नाही, कुठल्याजी आदेशाची गरज नाही. क्लिअर आहात तुम्ही. हा नाका कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुटू देणार नाही. आपल्याकडे पर्यात फोर्स आहे. 100 लोकांची फौज आहे. इथं तुम्हाला सुरुवातीच्या बंदोबस्तासाठी उभं केलं आहे. कोणतीही शंका नाही. करणार ना लाठीचार्ज? इथून एकही माणूस गेला नाही पाहीजे, असे आदेश देताना हे एसडीएम महाशय दिसून येत आहेत.
हेही वाचा :
आंदोलक शेतकऱ्यांची डोकी फोडण्याचे अधिकाऱ्याचे आदेश, करनालचा व्हिडीओ व्हायरल
करनालमध्ये भाजप विरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको; पोलिसांच्या लाठीचार्जमुळे शेतकरी रक्तबंबाळ
‘शेतकरी अडचणीत, तातडीनं एकरी 50 हजार अनुदान द्या’, किसान सभा टोमॅटो दर प्रश्नावर आक्रमक
व्हिडीओ पाहा :
Death of Farmer protester injured in Police lathi charge governor Malik angry