Hariyana Rape & Murder : हरियाणात अल्पवयीन मुलीची हत्या करुन बलात्कार, दोषींना फाशीची शिक्षा
पानिपतच्या मतलौदामध्ये मामाच्या घरी पीडित 12 वर्षाची मुलगी राहत होती. 13 जानेवारी 2018 रोजी पीडित मुलगी कचरा टाकण्यासाठी घरातून गेली. यावेळी घराबाहेर दबा धरुन बसलेल्या सागर आणि प्रदीप यांनी मुलीचा पाठलाग केला. त्यानंतर मुलीला वाटेतच उचलून तिला प्रदीप याच्या घरी घेऊन गेले. तेथे दोघांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
पानिपत : एका अल्पवयीन मुलीची हत्या (Murder) करुन तिच्या मृतदेहावर दोघांनी बलात्कार (Rape) केल्याची घटना हरियाणातील पानिपतमध्ये घडली आहे. याप्रकरणी दोघा आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा (Death Penalty) सुनावली आहे. सागर आणि प्रदीप अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी हत्या आणि बलात्कारानंतर मुलीचा मृतदेह नाल्यात फेकून दिला होता. त्यानंतर स्वतःचे कपडे जाळून टाकले आणि दोघेही फरार झाले होते. मुलगी अचानक गायब झाल्याने कुटुंबीयांना तिचा शोध सुरु केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह एका नाल्यात नग्नावस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपींचा शोध सुरु केला. (Death penalty for murder and rape of minor girl in Haryana)
कचरा टाकण्यासाठी गेली असता आरोपींनी अपहरण केले
पानिपतच्या मतलौदामध्ये मामाच्या घरी पीडित 12 वर्षाची मुलगी राहत होती. 13 जानेवारी 2018 रोजी पीडित मुलगी कचरा टाकण्यासाठी घरातून गेली. यावेळी घराबाहेर दबा धरुन बसलेल्या सागर आणि प्रदीप यांनी मुलीचा पाठलाग केला. त्यानंतर मुलीला वाटेतच उचलून तिला प्रदीप याच्या घरी घेऊन गेले. तेथे दोघांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगी खूपच आरडाओरडा करु लागल्याने नराधमांनी तिची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. गुन्हा केल्यानंतर पकडले जाऊ या भीतीने आरोपींनी आपले कपडे जाळून टेरेसवर लपवून ठेवले आणि मुलीचा मृतदेह नग्नावस्थेत नाल्यात फेकून दिला. त्यानंतर दोघेही फरार झाले.
दुसऱ्या दिवशी नाल्यात सापडला मृतदेह
कचरा टाकायला गेलेली मुलगी बराच वेळ झाला तरी परतली नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. मात्र मुलगी कुठेच सापडली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी थेट मुलीचा मृतदेह नाल्यात नग्नावस्थेत सापडला. याप्रकरणी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करीत कसून तपास केल्यानंतर पोलिस आरोपींपर्यंत पोहचले. सागर आणि प्रदीपला पोलिसांनी रिमांड घेतले असता हत्या आणि बलात्कार केल्याचे त्यांनी कबुल केले. त्यानंतर शुक्रवारी 18 फेब्रुवारी 2022 रोजी पानिपत न्यायालयाने दोन्ही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली.
पानिपतच्या गुन्हेगारी इतिहासातील पहिली केस
पानिपतच्या गुन्हेगारी इतिहासात POCSO कायद्यांतर्गत फाशीची शिक्षा देण्याची ही पहिलीच घटना आहे. न्यायालयाच्या निर्णयावर मुलीच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र न्याय मिळण्यास खूप उशीर झाल्याची खंतही व्यक्त केली आहे. फाशीची शिक्षा टाळण्यासाठी गुन्हेगार उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात गेल्यास तेथेही खटला लढवणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. (Death penalty for murder and rape of minor girl in Haryana)
इतर बातम्या
Chitra Wagh : शिवाजी महाराजांनी या सरकारचा कडेलोट केला असता; महिला मारहाणीवरून चित्रा वाघ संतापल्या