AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deep Sidhu Arrested | प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हिंसक आंदोलन, अभिनेता दीप सिद्धूला अटक

26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर मार्च दरम्यान हिंसा भडकली होती. त्याचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. (Deep Sidhu Red Fort violence case arrested)

Deep Sidhu Arrested | प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हिंसक आंदोलन, अभिनेता दीप सिद्धूला अटक
अभिनेता दीप सिद्धू
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 11:21 AM

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी अभिनेता आणि गायक दीप सिद्धूला (Deep Sidhu Arrested) अटक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी दीपला बेड्या ठोकण्यात आल्या. दिल्लीच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. पोलिसांनी दीप सिद्धूवर एक लाखाचे इनाम घोषित केले होते. (Deep Siddhu accused in 26th January violence case arrested)

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी माहिती देणाऱ्या रोख बक्षीस देण्याची घोषणा पोलिसांनी केली होती. बूटा सिंह, सुखदेव सिंह, जजबीर सिंह आणि इकबाल सिंह यांच्यावर प्रत्येकी 50 हजारांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. तर दीप सिद्धूसह जुगराज सिंह, गुरजोत सिंह आणि गुरजंत सिंह यांच्यावर प्रत्येकी एक लाखाचे बक्षीस होते.

हिंसेच्या चौकशीसाठी एसआयटी

26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर मार्च दरम्यान हिंसा भडकली होती. त्याचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. जॉइंट कमिशनर बी. के. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची टीम तपास करत आहे. या टीममध्ये तीन डीसीपींचा समावेश करण्यात आला आहे. यात जॉय टिर्की, भीष्म सिंह आणि मोनिका भारद्वाज यांचा समावेश आहे.

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी हिंसाचार

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसेत 394 पोलीस जखमी झाले होते. त्यात पोलिसांच्या 30 गाड्यांचे नुकसान झालं होतं. दिल्ली पोलिसांनी या हिंसेत गंभीर जखमी झालेल्या पोलिसांना प्रत्येकी 25-25 हजार रुपयांची आर्थिक मदत तर इतर जखमींना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. (Deep Siddhu accused in 26th January violence case arrested)

कोण आहे दीप सिद्धू?

दीप सिद्धू, मुक्तसर जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याचा जन्म 1984 मध्ये झाला होता. तो एक पंजाबी अभिनेता आहे. दीप सिद्धूने कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. त्याने किंगफिशर मॉडेल हंट अवॉर्ड जिंकला होता. त्यानंतर त्याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. 2015 मध्ये त्याचा पहिला सिनेमा ‘रमता जोगी’ रिलीज झाली. मात्र सिद्धूला 2018 मधील ‘जोरा दास नम्ब्रिया’ या पंजाबी चित्रपटातून मोठी ओळख मिळाली.

सिद्धू अभिनेत्यासोबत एक सामाजिक कार्यकर्ताही आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सनी देओल यांच्या टीमने त्यांना स्वतःसोबत सहभागी करुन घेतले. जेणेकरुन तो स्थानिक लोकांना सनी देओल यांना वोट करण्यासाठी प्रोत्साहित करु शकेल.

संबंधित बातम्या :

दीप सिद्धूसह इतर फरार आरोपींवर प्रत्येकी 1 लाखांचं बक्षीस; तपासासाठी एसआयटी

Fact Check : दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीला भडकवण्याचा आरोप असलेल्या अभिनेता दिप सिद्धुचं भाजप कनेक्शन?

(Deep Siddhu accused in 26th January violence case arrested)

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.