शशी थरुरांचा पराभव झाला तो त्यांनी मान्यही केला , मात्र काँग्रेसला त्यांनी ताकीदही दिलेय…

थरूर (Shashi Tharoor) यांचा पराभव झाला असला तरी त्यांची 1,072 मते ही गांधी कुटुंबासाठी एक प्रकारचा सावधगिरीचा इशाराही असल्याचे सांगितले जात आहे.

शशी थरुरांचा पराभव झाला तो त्यांनी मान्यही केला , मात्र काँग्रेसला त्यांनी ताकीदही दिलेय...
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 9:50 PM

नवी दिल्लीः काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक (Congress President Election 2022) पार पडल्यानंतर आता पुन्हा एकदा नेतृत्वावरुन जोरदार चर्चा होऊ लागली आहे. या निवडणुकीने पक्ष आणि गांधी परिवाराच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत थरूर (Shashi Tharoor) यांचा पराभव झाला असला तरी त्यांची 1,072 मते ही गांधी कुटुंबासाठी (Gandhi Family) एक प्रकारचा सावधगिरीचा इशाराही असल्याचे सांगितले जात आहे.

थरुरांचा पराभव झाला असला तरी त्यांना आता कोणते ना कोणते पद देऊन त्यांना सांभाळणेही गरजेच आहे असं मत राजकीय विश्लेषक मांडत आहेत.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर नवे अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांची निवड करण्यात आली आहे. तर या निवडणुकीत शशी थरूर यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस अध्यक्ष पदाच्या या निवडणुकीत 9,385 मतं पडली होती.

तर त्यापैकी खरगे यांना 7897 मते मिळाली तर थरूर यांना 1072 मतांवर समाधान मानावे लागले आहे. तर 416 मते अवैध ठरली आहेत.

शशी थरूर यांच्या या पराभवाने देशातील सर्वात जुना पक्ष काँग्रेस पक्षालाच जो संदेश द्यायचा आहे तो त्यांनी दिला आहे. या निवडणुकीतील पराभवाच्या फरकाने काँग्रेसमधील परिवर्तनाची इच्छा स्पष्टपणे दिसून येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

शशी थरूर यांच्यासाठी 1072 मतांची संख्या परिणाम कारक आहे. आणि गांधी कुटुंबीयांसाठी एक प्रकारचा ती सुचनाही आहे. त्या 1 हजार मतातूनच काँग्रेस पक्षातील बदलाची अपेक्षा करण्यात आली आहे.

जर 9000 पैकी 1072 लोक त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीला मतदान करू शकत असतील तर, हीच विचारसरणी असलेल्या काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींची संख्या अधिक असण्याचीही शक्यता आहे असंही सांगण्यात येत आहे.

या परिस्थितीत 2024 नंतर होणाऱ्या निवडणुकीत हा आकडा उलटण्याची शक्यता आहे. म्हणजे 8000 मते गांधी घराण्याच्या विरोधातील उमेदवाराला जाऊ शकतात आणि गांधींना पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराला फक्त 1072 मते मिळू शकतात असंही मत व्यक्त केले जात आहे.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.