India-China Tension | चीनची अरेरावी, मागे हटायला तयार नाही, अखेर भारताच्या संरक्षण सचिवांच मोठं विधान
India-China Tension | भारत-चीनच सैन्य मागच्या चार वर्षांपासून आमने-सामने आहे. त्यावर ताज्या लष्करी चर्चेमध्ये कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यानंतर संरक्षण सचिवांनी हे मोठ विधान केलय. चीनने किती हजार सैन्य तैनात केलय? भारताची काय तयारी आहे? त्या बद्दल जाणून घ्या.
नवी दिल्ली : नुकतीच भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. पूर्व लडाखच्या देपसांग आणि डेमचॉक या भागात भारत आणि चीनच सैन्य आमने-सामने आहे. हा तणाव निवळावा यासाठी भारताने लष्करी चर्चेच्या माध्यमातून प्रयत्न केले. पण चीनने नेहमीप्रमाणे प्रतिसाद दिला नाही. हेकेखोरपणे चीन आपल्या बाजूवर ठाम राहिला. त्यानंतर भारताचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी एक मोठ विधान केलय. ‘चीनची अरेरावी आम्ही खपवणार नाही, दादागिरी मोडून काढण्यासाठी आमचं सैन्य सज्ज आहे’ असं संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी म्हटलं आहे.
इंडस एक्स संरक्षण परिषदेत गिरीधर अरमाने बोलत होते. यूएस इंडो-पॅसिफिक कमांडचे प्रमुख एडमिरल जॉन सी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मे 2020 मध्ये पूर्व लडाख भागात भारत-चीनमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यावेळी अमेरिकेने लगेच गोपनीय माहिती आणि तिथल्या परिस्थिती संदर्भात कल्पना दिली होती. त्या बद्दल गिरीधर अरमाने यांनी अमेरिकेचे आभार मानले.
कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज
सध्याच्या स्थितीत पीपल्स लिबरेशन आर्मीने पश्चिम लडाख येथे मोठ्या शस्त्रास्त्रांसह 50 ते 60 हजार सैनिक तैनात केले आहेत. पूर्व लडाखमध्ये चीनने 90 हजार सैनिक तैनात केलेत. TOI ने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. भारताने सुद्धा त्याच तोडीची सैन्य तैनाती केलीय हे अरमाने यांच्या वक्तव्यातून दिसून येतं. “चीनला लागून असलेल्या प्रत्येक सीमेवर अगदी डोंगराळ भागातही आम्ही कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहोत. चीनच्या दादागिराला जशास तस उत्तर देण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत” असं गिरीधर अरमाने यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेकडून काय अपेक्षा?
“आम्हाला जिथे मदतीची गरज असेल, तिथे आमचा मित्रदेश अमेरिका आमच्यासोबत असेल अशी अपेक्षा आहे. आपण दोघांनी एकत्र येण गरजेच आहे. आणीबाणीच्या प्रसंगात आमच्या मित्रांनी आम्हाला जी मदत केली, त्याच आम्हाला कौतुक आहे” असं गिरीधर अरमाने म्हणाले. पूर्व लडाखमध्ये भारत-चीनच सैन्य मागच्या चार वर्षांपासून आमने-सामने आहे. त्यावर ताज्या लष्करी चर्चेमध्ये कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यानंतर संरक्षण सचिवांनी हे मोठ विधान केलय.