Video :अपघातातून बचावलेले एकमेव ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती कशी आहे? राजनाथ सिंगांची सभागृहाला माहिती

एअरफोर्सचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग (Varun Singh) यांच्या प्रकृतीविषयी राजनाथ सिंह यांनी माहिती दिली. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर वेलिंग्टनच्या मिलटरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Video :अपघातातून बचावलेले एकमेव ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती कशी आहे? राजनाथ सिंगांची सभागृहाला माहिती
ग्रुप कॅप्टन वरुणसिंग हे गंभीर असून त्यांचं एक पत्र सध्या चर्चेत आहे.
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 12:06 PM

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी लोकसभेत (Loksabha ) सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेविषयी लोकसभेत निवेदन केलं. त्यामध्ये बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. एअरफोर्सचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग (Varun Singh) यांच्या प्रकृतीविषयी राजनाथ सिंह यांनी माहिती दिली. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर वेलिंग्टनच्या मिलटरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वरुण सिंग जीवनरक्षक प्रणालीवर आहेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

वरुण सिंग यांना सैन्यदलातील सेवेचा वारसा

वरुण सिंग हे उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील कन्हौली गावातील आहेत. त्यांचं वय 40 वर्ष आहे. सध्या त्यांची नेमणूक तामिळनाडूच्या वेलिंग्टनमध्ये आहे. तिथेच ते त्यांची पत्नी उमा सिंग, मुलगा आणि मुलीसह वास्तव्यास आहेत. कर्नल के. पी. सिंग यांचे ते सुपुत्र असून वरुण सिंग यांना सैन्यदलातील सेवेचा वारसा आहे. मध्यप्रदेशमध्ये देखील त्यांचं स्वत: च घर असून तिथे ते वास्तव्यास होते. वरुण सिंग यांचा भाऊ तनुज सिंग भारतीय नौदलातात कार्यरत आहेत. बुधवारी ते सीडीएस बिपीन रावत यांच्यासह हेलिकॉप्टरमधून कोईम्बतूरमधील सुलूरमधून वेलिंग्टनकडे जात होते.

2020 मध्ये शौर्य चक्रानं सन्मान

ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांना यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. 2020 मध्ये हवाई आणीबाणीच्या वेळी त्यांचे LCA तेजस लढाऊ विमान वाचवल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला होता. त्याचवेळी अपघाताची माहिती मिळताच कुटुंबात एकच खळबळ उडाली. सध्या या घटनेची माहिती लष्कराकडून कुटुंबीयांना देण्यात आली आहे. मात्र, अपघात झाल्यापासून वरुणची पत्नी त्याच्यासोबत रुग्णालयात आहे.

राजनाथ सिंह यांनी सांगितला घटनाक्रम

काल दुपारी 12.15 वाजता हेलिकॉप्टरला विलिंग्टनमध्ये लँड व्हायचं होतं. सुलूर येथील एअरबेसवरील एअर ट्राफिक कंट्रोलनं 12.08 हेलिकॉप्टरवरील आपलं नियंत्रण गमावलं. थोड्या वेळानंतर सुलूर स्थानिक लोकांनी जंगलात आग लागल्याचं पाहिलं. तिथं त्यांना मिलटरीच्या हेलिकॉप्टरला आगीत असल्याचं पाहिलं. त्यानंतर स्थानिक प्रशासनाचं पथक तिथं पोहोचलं. तिथून जेवढ्या लोकांना बाहेर काढता येईल त्यांना काढण्यात आलं. त्यांना वेलिंग्टनच्या रुग्णालयात पोहोचवण्यात आलं. मात्र , 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला.

सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, संरक्षण सल्लागार ब्रिगेडियर लखवींदर सिंग लिठ्ठर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, विंग कमांडर पृथ्वीसिंह चौहान, स्क्वेड्रन लीडर कुलदीप सिंग, ज्युनिअर वॉरंट ऑफिसर अरक्कल प्रदीप, ज्युनिअर वॉरंट ऑफिसर हरवींदर रॉय, ज्युनिअर वॉरंट ऑफिसर राणा प्रताप दास, लान्स नायक बी साई तेजा, लान्स नायक गुरुसेवक सिंग, लान्स जितेंद्र कुमार यांच्या पार्थिवाला विशेष विमानानं दिल्लीत आणलं जाईल. एअरफोर्सचे प्रमुख चौधरी कालचं घटनास्थळावर पाहणी करण्यास गेले आहेत. त्यांनी घटनास्थळ आणि वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये पाहणी केली. एअरमार्शल मानवेंद्र यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ते देखील कालच घटनास्थळावर पाहणी करण्यासाठी गेले आहेत. सीडीएस बिपीन रावत यांच्यासह सर्व शहीद जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, असं राजनाथ सिंग म्हणाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील दुर्घटेनवर शोक व्यक्त केला.

इतर बातम्या:

VIDEO | हा तोच जनरल रावतांच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा Video आहे? ढगात शिरताना शेवटी काय दिसतंय?

Bipin Rawat : रावत यांच्याबरोबर अनेक रहस्य संपली, हेलिकॉप्टर अपघाताने सर्वोच्च नेतृत्वही गोंधळलं: संजय राऊत

Bipin Rawat : बिपीन रावत यांच्याकडून छत्रपती ताराराणींच्या इतिहासाची आपुलकीनं विचारणा, संभाजी छत्रपतींनी जागवल्या आठवणी

Defense Minister Rajnath Singh told health update of Group Captain Varun Singh in Lok Sabha and the military helicopter crash in Tamil Nadu

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.