Delhi Elections : मोठी बातमी! दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक
मोठी बातमी समोर येत आहे, आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे.
मोठी बातमी समोर येत आहे, आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सातत्यानं विरोधकांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे, यावर देखील या पत्रकार परिषदेमधून निवडणूक आयोगानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
कधी होणार दिल्ली विधानसभा निवडणूक?
निवडणूक आयोगानं दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे, पाच फेब्रुवारीला मतदान होणार असून, आठ तारखेला निवडणुकीचा निकाल आहे. 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे.
महत्त्वाच्या तारखा
उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख – 17 जानेवारी 2025 उमेदवारी अर्जाची छाननी – 18 जानेवारी 2025 उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – 20 जानेवारी 2025 मतदानाची तारीख – 5 फेब्रुवारी 2025 मतमोजणीचा दिवस – 8 फेब्रुवारी 2025
ईव्हीएमच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं उत्तर
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं, स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीच्या राज्यात तब्बल 232 जागा निवडून आल्या, तर महाविकास आघाडीला तीन पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्यानं ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. यावर देखील आज निवडणूक आयोगानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ईव्हीएम हॅक करता येत नाही असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. तसेच सायंकाळी सहानंतर अचानक मतदान वाढलं कसं असा प्रश्नही महाविकास आघाडीकडून उपस्थित करण्यात येत होता. या प्रश्नाला देखील या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर दिल्ल आहे. सायकाळी साडेसहाला जो आकडा जाहीर करण्यात येतो, त्यामध्ये मतदानाची पूर्ण टक्केवारी सांगता येणं अवघड असतं, मात्र फायनल टक्केवारी ही रात्री आकराच्या सुमारास येते असं त्यांनी म्हटलं आहे.
दिल्लीमध्ये भाजप विरूद्ध आप
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे, यावेळी दिल्लीमध्ये भाजप विरूद्ध आप असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. कोण बाजी मारणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.