अवघ्या काही तासांच्या पावसाने दिल्ली जलमय, हवामान खात्याचा रेड अलर्ट
राजधानी दिल्लीतील पॉश म्हणवल्या जाणाऱ्या भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. करोलबाग गेल्या चार-पाच दिवसांपासून चर्चेत आहे. येथे, आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. आजही हा परिसर पाण्यात बुडाला आहे.
राजधानी दिल्ली बुधवारी सायंकाळी उशिरा वातावरणात बदल होऊन जोरदार पाऊस सुरु झालाय. दमदार पावसामुळे एकीकडे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असतानाच दुसरीकडे मात्र अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दिल्ली आणि नोएडाचे रस्त्यावर पाणी साचले आहे. पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सायंकाळी कार्यालयातून निघालेल्या कर्मचाऱ्यांची पावसामुळे तारांबळ उडाली. अवघ्या दोन तासांच्या पावसात दिल्ली जलमय झाली आहे. हवामान खात्याने मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता.
रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे भीषण वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झालीये. अवघ्या काही तासांचा पाऊस दिल्लीसाठी आपत्ती ठरण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिल्ली आणि परिसरात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. पाऊस अनेक विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
#WATCH | Delhi: Traffic flow impacted near ITO as a result of heavy rains and waterlogging pic.twitter.com/clEyUfWurL
— ANI (@ANI) July 31, 2024
हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे
यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच चांगला पाऊस झाला आहे. स्कायमेट वेदर या हवामान संस्थेचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी ट्विटरवर पोस्ट केले की, पुढील २४ तासांत पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये चांगला पाऊस होईल. पश्चिम उत्तर प्रदेशातील बिजनौर, सहारनपूर, मेरठमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. जर आपण बुधवारी म्हणजेच आजच्या हवामानाबद्दल बोललो तर दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये लखनौ, प्रयागराज, प्रतापगड आणि कौशांबीसह इतर जिल्ह्यांमध्ये दुपारी जोरदार पाऊस झाला, तर संध्याकाळी मान्सून दिल्ली-एनसीआरमध्ये दाखल झाला.
#WATCH | Traffic jam witnessed in ITO area of Delhi after rain lashed the city. pic.twitter.com/toJg5NUWch
— ANI (@ANI) July 31, 2024
लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गरजेशिवाय प्रवास करू नका, असा सल्लाही देण्यात आला आहे.
#WATCH | Delhi: Severe waterlogging witness near AIIMS after incessant rainfall in the national capital. pic.twitter.com/GaiijAODtJ
— ANI (@ANI) July 31, 2024