मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोई गँगवर पोलिसांची मोठी कारवाई, इतक्या शुटर्सना अटक

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याआधी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर देखील लॉरेन्स बिश्नोई चर्चेत होता. लॉरेन्स बिश्नोई गँग देशभरातील अनेक राज्यांमध्ये पसरली आहे. आता पोलिसांकडून त्यांच्या विरोधात जोरदार कारवाई सुरु झाली आहे.

मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोई गँगवर पोलिसांची मोठी कारवाई, इतक्या शुटर्सना अटक
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 4:32 PM

लॉरेन्स बिश्नोई टोळीविरुद्ध केलेल्या कारवाईत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश आलंय. कारण पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या 7 शूटर्सना अटक केली आहे. या सर्व शूटर्सना पंजाब आणि इतर राज्यांतून अटक करण्यात आलीये. पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्रेही जप्त केली आहेत. याआधी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) लॉरेन्स बिश्नोई गँगवर कारवाई केली होती. एनआयएने लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोईवर १० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. अनमोल बिश्नोई उर्फ ​​भानू हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. सिद्धू मूसेवाला हत्याप्रकरणात तो आरोपी आहे.

अनमोल बिश्नोईवर 18 गुन्हे

2023 मध्ये तपास यंत्रणेने अनमोल विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. तो बनावट पासपोर्टवर भारतातून पळून गेला होता. अनमोल बिश्नोई हा वांरवार ठिकाण बदलत राहतो. तो गेल्या वर्षी केनिया आणि या वर्षी कॅनडामध्ये दिसला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल बिश्नोईवर 18 गुन्हे दाखल आहेत. त्याने जोधपूर तुरुंगात शिक्षा देखील भोगली आहे. 7 ऑक्टोबर 2021 रोजी अनमोलची जामिनावर सुटका झाली होती.

बाबा सिद्दीकी हत्याकांडात देखील त्याचं नाव समोर आलं आहे. तपास करणाऱ्या मुंबई क्राईम ब्रँचला आरोपीच्या चौकशीदरम्यान गोळीबार करणारा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या थेट संपर्कात असल्याचे समोर आले होते. बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या शुटर्सच्या मोबाईलमध्ये ते अनमोल बिश्नोई याच्याशी इन्स्टंट मेसेजिंग ॲप (स्नॅपचॅट) द्वारे बोलत असल्याचं समोर आलंय.

अनमोल बिश्नोई हा शूटर आणि या प्रकरणातील सूत्रधार प्रवीण लोणकरच्या संपर्कात होता. अनमोल कॅनडा आणि अमेरिकेतून आरोपींच्या संपर्कात होता. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याच्या रात्री मुंबईतील वांद्रे भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरैन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने याआधी अभिनेता सलमान खान याला देखील जीवे मारण्याची धमकी दिली होती.

Non Stop LIVE Update
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा.
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'.
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?.
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?.
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक.
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?.
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'.
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने.
'हम तो ऐसे बदनाम है की बदनामी...', गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा
'हम तो ऐसे बदनाम है की बदनामी...', गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा.