Rahul Gandhi : दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग, राहुल गांधी यांच्या घरी पोलीस पोहोचले; काय आहे प्रकरण?

भारत जोडो यात्रे दरम्यान श्रीनगर येथे राहुल गांधी यांनी केलेलं विधान त्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहेत. या विधानावरून त्यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस बजावली होती. आता थेट पोलीस त्यांच्या घरी पोहोचले आहेत.

Rahul Gandhi : दिल्लीत मोठ्या घडामोडींना वेग, राहुल गांधी यांच्या घरी पोलीस पोहोचले; काय आहे प्रकरण?
rahul gandhiImage Credit source: rahul gandhi
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 11:16 AM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारत जोडो यात्रेत श्रीनगर येथे केलेल्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका पीडितेच्या लैंगिक शोषणाप्रकरणी राहुल गांधी यांनी विधान केलं होतं. या प्रकरणी राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस जारी केली होती. त्यांना या पीडितेची माहिती देण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र राहुल गांधी यांनी या नोटिशीला काहीच उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे आता दिल्ली पोलीस त्यांच्या घरी पोहोचली आहे. स्पेशल सीपी (कायदा आणि सुव्यवस्था ) सागर प्रीत हुड्डा हे राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले आहेत.

आम्ही राहुल गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो आहोत. राहुल गांधी यांनी 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये एक विधान केलं होतं. यात्रे दरम्यान अनेक महिला मला भेटल्या. त्यांनी त्यांच्यावर बलात्कार झाल्यचं सागितलं होतं. राहुल गांधी यांच्याकडून याचीच माहिती घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण त्या महिलांना न्याय मिळावा हा आमचा हेतू आहे, असं सागर प्रीत हुड्डा यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली होती. ही यात्रा श्रीनगरला पोहोचली होती. तेव्हा राहुल गांधी यांनी येथील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी अत्यंत धक्कादायक विधाने केली होती. महिलांचं लैंगिक शोषण होत आहे. आमच्याकडे तशा तक्रारी आल्या आहेत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. दिल्ली पोलिसांनी या विधानाची गंभीर दखल घेत राहुल गांधी यांना नोटीस बजावली. आम्हाला त्या महिलांचीन नावे द्या. त्यांची माहिती द्या. म्हणजे आम्हाला कारवाई करता येईल, असं पोलिसांनी या नोटिशीत म्हटलं होतं.

नोटिशीत काय प्रश्न विचारले?

ही माहिती तुम्हाला महिलांनी कधी आणि कोणत्या ठिकाणी भेटून सांगितली?

तुम्ही या महिलांना आधीपासून ओळखता का?

त्या महिलांची माहिती तुमच्याकडे आहे काय?

तुमची प्रतिक्रिया सोशल मीडियावर फिरत आहे, ती खरी आहे काय?

महिलांनी एखाद्या स्पेसिफिक घटनेची माहिती दिलीय का?

तीन तास वाट पाहिली

दिल्ली पोलिसांचे एक सीनियर अधिकारी बुधवारी नोटीस घेऊन राहुल गांधी यांच्या घरी गेले होते. मात्र, तीन तासाच्या प्रतिक्षेनंतरही त्यांना राहुल गांधी भेटले नव्हते. त्यानंतर तो वरिष्ठ अधिकारी पुन्हा दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांना भेटण्यासाठी गेला. त्यांना भेटण्याची आणि चर्चा करण्याची वेळ मागितली. मात्र, आपल्याकडे वेळ नाही, असं राहुल गांधी यांनी त्यांना कळवलं. त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी यांना नोटीस बजावली. या प्रकरणाचा वेगाने तपास व्हावा म्हणून या नोटिशीला लवकरात लवकर उत्तर देण्यास पोलिसांनी सांगितलं होतं.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.