मैत्रिणीकडून मागितले न्यूड फोटो, घटनेच्या रात्री दारू प्यायली; पॉलीग्राफी टेस्टमध्ये संजय रॉयचे काळे कृत्य उघड
Kolkata Rape-Murder Case: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याने सीबीआयसमोर अनेक खुलासे केले आहेत. महिला डॉक्टरवर बलात्कार करण्यापूर्वी तो रेड लाईट एरियातही गेला होता. आरोपीची पॉलीग्राफी टेस्ट करण्यात आली ज्यामध्ये त्याने सत्य उघड केले आहे.
कोलकाता बलात्कार हत्याकांडप्रकरणी रोज नवीन खुलासे होत आहेत. सीबीआयने आरोपी संजय रॉयसह अनेकांची पॉलीग्राफ टेस्ट केली. आरोपी संजय रॉयने लाय डिटेक्टर टेस्टमध्ये अनेक गोष्टींची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे. चाचणी दरम्यान, संजय रॉयने केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) ला सांगितले की गुन्ह्याच्या काही तास आधी तो त्याच्या मित्रासह रेड लाईट एरियामध्ये गेला होता. मात्र, त्यांनी लैंगिक संबंध ठेवले नाहीत. चाचणीदरम्यान संजय रॉयने रस्त्यात एकीचा विनयभंग केल्याची कबुलीही दिली. संजय रॉयने आपल्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून तिचे न्यूड फोटो मागितल्याचा दावा करण्यात आला आहे.
आरोपीची पॉलीग्राफ टेस्ट
घटनेच्या रात्री संजय रॉयने मित्रासोबत बसून दारू प्यायली. त्यानंतर तो रेड लाईट एरियाकडे रवाना झाला. चेतला येथे जात असताना त्याने एका मुलीचा विनयभंग केल्याचं देखील त्याने सांगितले. संजय रॉय सकाळी 4.03 वाजता सेमिनार हॉलजवळील कॉरिडॉरमध्ये गेला. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरजी कार हॉस्पिटलच्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी संजय राय याने पॉलीग्राफ चाचणीदरम्यान सांगितले की, बलात्कार आणि खून केल्यानंतर तो पोलीस अधिकारी असलेला त्याचा मित्र अनुपम दत्ता याच्या घरीही गेला होता.
फोनमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ
सीबीआयने आरोपीचे प्रोफाईल तयार केले, ज्यावरून त्याला घाणेरड्या व्हिडिओंचे व्यसन असल्याचे उघड झाले. त्याच्या फोनवर अनेक अश्लील क्लिप सापडल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांच्या भूमिकेचीही सीबीआय चौकशी करत आहे. शनिवारी त्यांची लाय डिटेक्टर चाचणीही घेण्यात आली.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, संजय रॉय यांना पोर्नोग्राफी पाहण्याचे व्यसन असल्याचं समोर आलेय. त्याने चाचणीदरम्यान सीबीआयला काही दिशाभूल करणारी उत्तरेही दिली. महिला डॉक्टरच्या शरीरावर 25 बाह्य आणि अंतर्गत जखमा होत्या. महिला डॉक्टरची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांच्या भूमिकेचीही सीबीआय चौकशी करत आहे. गेल्या आठवड्यातच सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता पोलिसांना या प्रकरणी कडक शब्दात विचारले होते की, एफआयआर नोंदवायला १२ तासांपेक्षा जास्त वेळ का लागला?
संजय रॉयने आपल्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला होता आणि न्यूड फोटोही मागवले होते. रेड लाईट एरियात गेल्यानंतर दोघेही हॉस्पिटलमध्ये आले आणि पहाटे 4.03 वाजता संजय हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलच्या कॉरिडॉरमध्ये गेले. बलात्कार आणि खून केल्यानंतर तो पोलीस अधिकारी असलेला त्याच्या मित्राच्या घरीही गेला होता.