देवेंद्र फडणवीस एनडीएच्या बैठकीसाठी पाटण्याला, बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अधिकृत निर्णय होणार

बिहारच्या मुख्यमंत्रिपदी नितीश कुमार यांच्या नावाच्या घोषणेची औपचारिकता बैठकीच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे.

देवेंद्र फडणवीस एनडीएच्या बैठकीसाठी पाटण्याला, बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अधिकृत निर्णय होणार
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 1:09 PM

पाटणा : बिहारमध्ये एनडीएची सत्ता येणे आता निश्चित आहे. जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार (Nitish Kumar) पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर (Bihar Chief Minister) विराजमान होणार आहेत. एनडीएच्या बैठकीला हजेरी लावण्यासाठी भाजपचे बिहार प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पाटण्याला गेले आहेत. नितीश कुमार यांच्या नावाच्या घोषणेची औपचारिकता बैठकीच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे. (Devendra Fadnavis in Patna to attend NDA meeting post Bihar polls)

बिहारमध्ये सरकार बनवण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांच्या घरी एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विधिमंडळ पक्षनेता अर्थात मुख्यमंत्रिपदाबाबत शिक्कामोर्तब होणार आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस यासारखे दिग्गज नेते उपस्थित आहेत.

नितीश कुमार आजच राज्यपालांची भेट घेऊन समर्थक आमदारांचं पत्र राज्यपालांना देण्याचीही शक्यता आहे. तसंच राज्यपालही नितीश कुमार यांना सोमवारी शपथविधीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. जेडीयू आणि भाजपकडून सरकार स्थापनेची सगळी तयारी पूर्ण झाली आहे.

नितीश कुमार मुख्यमंत्रिपदी जरी विराजमान झाले तरी मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती भाजपकडे जाणार असल्याच्या चर्चा आहेत. कारण जेडीयूच्या तुलनेत भाजप आमदारांची संख्या जास्त आहे. भाजपचे जास्त आमदार असून देखील जेडीयूला मुख्यमंत्रिपद मिळणार असल्याने अगोदरच पक्षात नाराजीचा सूर आहे. अशा परिस्थितीत काही महत्त्वाची खाती भाजपकडे राहणार असल्याचे आडाखे काही राजकीय निरीक्षक बांधताना दिसत आहेत.

सरकार स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी चारही पक्षांमध्ये नितीशकुमार यांच्या निवासस्थानी बैठक झाली आहे. या बैठकीत गटनेता म्हणून नितीशकुमार यांच्या नावावर सहमती झाल्याचे सांगितले जात आहे.

बिहार विधानसभा निवडणूक पक्षीय बलाबल

एनडीए – 125 महागठबंधन – 110

राजद (महागठबंधन) – 75 भाजप (एनडीए) – 74 जदयू (एनडीए) – 43 काँग्रेस (महागठबंधन) – 19 (Devendra Fadnavis in Patna to attend NDA meeting post Bihar polls) मार्क्सवादी-लेनिनिस्ट कम्युनिस्ट पक्ष (महागठबंधन) – 12 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) (महागठबंधन) – 02 भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) (महागठबंधन) – 02 एमआयएम – 05 हिंदुस्थानी आवाम मोर्चा (सेक्युलर) (एनडीए) – 04 विकसनशील इन्सान पक्ष (एनडीए) – 04 बसप – 01 लोजप – 01 अपक्ष – 01 एकूण – 243

संबंधित बातम्या

बिहारमध्ये राजकीय हालचाली वाढल्या; मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस

नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होणार, भाजपमध्ये अंतर्गत नाराजी?

(Devendra Fadnavis in Patna to attend NDA meeting post Bihar polls)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.