आघाडी सरकारला आरक्षण द्यायचंच नाहीये, त्यामुळेच वेळकाढूपणा सुरू आहे; फडणवीसांचा दिल्लीतून हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस दिल्लीत आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्ला चढवला. (Devendra Fadnavis)

आघाडी सरकारला आरक्षण द्यायचंच नाहीये, त्यामुळेच वेळकाढूपणा सुरू आहे; फडणवीसांचा दिल्लीतून हल्लाबोल
Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 2:16 PM

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला आरक्षणच द्यायचं नाहीये. त्यामुळेच त्यांच्याकडून वेळकाढूपणा केला जात आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर केली आहे. (devendra fadnavis slams maha vikas aghadi over 127th Constitution Amendment Bill)

देवेंद्र फडणवीस दिल्लीत आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्ला चढवला. ठाकरे सरकारला आरक्षणच द्यायचं नाहीये. त्यामुळे त्यांनी 50 टक्के मर्यादेचं नवं कारण शोधलं आहे. इंदिरा सहानी केसमध्ये अतिशय क्लिअरपणे यावर भाष्य केलं आहे. सध्या मुद्दा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा नाहीये. तर मुद्दा मागास घोषित करण्याचा आहे. एखाद्या समाजाला मागास घोषित केल्यानंतर किती टक्के आरक्षण द्यायचं हा नंतरचा भाग आहे. अजून मागासच घोषित केलं नाही, मग आरक्षणाच्या मर्यादेचा प्रश्न येतो कुठे? असा सवाल करतानाच आतापर्यंत जातींना मागास ठरवण्याचा अधिकार राज्याला नाही म्हणून केंद्राकडे बोट दाखवलं जात होत. आता राज्यांना अधिकार मिळतोय. त्यामुळे सरकारने कारवाई करावी, असं ते म्हणाले. नवनवीन मुद्दे काढून सरकार वेळकाढूपणा करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

विरोधकांनी सहकार्य करावं

राज्याचे अधिकार राज्याकडेच राहतील अशी आमची मागणी होती याबद्दल आज अमित शहा यांची भेट घेतली. आज 127 व्या घटना दुरूस्तीच महत्वाच विधेयक मांडलं जाणार आहे. हे विधेयक याच अधिवेशनात मंजूर करण्याची विनंती शहांना केली. परंतु विरोधकांनी सध्या लॉकजाम सुरू केला आहे. ते कामकाज होऊ देत नाही. किमान या बिला करीता तरी कामकाज होऊ द्यावं. ओबीसी आणि मराठा समाजासाठीचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याला तात्काळ मान्यात दिली पाहिजे, असं ते म्हणाले. शहांसोबत इतर विषयांवरही चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

प्रदेशाध्यक्ष बदलणार नाही

चंद्रकांत पाटील शनिवारपासून दिल्लीत आहेत. काल त्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला उत्तर दिले होते. आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. खरं तर भाजप काय आहे हे तुम्हाला कळलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजप समजली पाहिजे, असं सांगतानाच दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. अगदी ग्रासरुटच्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत हा बदल होत असतो, असं पाटील म्हणाले. काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपमध्ये तसं नाही. त्यामुळे भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. (devendra fadnavis slams maha vikas aghadi over 127th Constitution Amendment Bill)

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: दिल्लीत भाजप नेत्यांची खलबतं, देवेंद्र फडणवीस अमित शाहांच्या भेटीला

ओबीसींना आरक्षण द्या, भाजपचा आघाडीला डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम; मंत्र्यांना दिला ‘हा’ इशारा

NDAतून बाहेर पडलेली शिवसेना आता UPAमध्ये जाणार? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

(devendra fadnavis slams maha vikas aghadi over 127th Constitution Amendment Bill)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.