… तर बदली रॅकटप्रकरणी कोर्टात जाऊ; गृहसचिवांना भेटल्यानंतर फडणवीसांचा इशारा

महाराष्ट्रातील पोलीस दलात झालेल्या बदल्याप्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (Devendra Fadnavis Submits 'evidence' Of Maha Police Transfer Racket To Home Secretary)

... तर बदली रॅकटप्रकरणी कोर्टात जाऊ; गृहसचिवांना भेटल्यानंतर फडणवीसांचा इशारा
Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 7:48 PM

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील पोलीस दलात झालेल्या बदल्याप्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच वेळ आल्यास या प्रकरणी कोर्टातही जाणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला. (Devendra Fadnavis Submits ‘evidence’ Of Maha Police Transfer Racket To Home Secretary)

देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची भेट घेऊन महाराष्ट्र पोलीस दलातील बदल्या आणि पदोन्नतीतील रॅकेटबाबतची माहिती दिली. तसेच या प्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या भेटीची माहिती दिली. ही संपूर्ण माहिती आणि पुरावे पडताळून सुयोग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहसचिवांनी दिले आहे. आयपीएस अधिकारी हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने केंद्र सरकार तशी चौकशी करू शकते, असे आपले मत आहे. असे असले तरी याप्रकरणी वेळ आली तर आम्ही न्यायालयात जाऊ, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी संवाद ऐकले?

25 ऑगस्ट 2020 पासून हा अहवाल का दडवून ठेवला, तत्कालिन पोलिस महासंचालकांनी सीआयडी चौकशीची शिफारस केली असताना ती का होऊ दिली नाही. कुणाचे बिंग फुटण्यापासून सरकार घाबरत होते. माझी माहिती आहे की, यातील काही संवाद स्वत: मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ऐकले आहेत, असा दावाही फडणवीस यांनी केला.

मलिकांच्या आरोपांना उत्तर

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी ही प्रक्रिया प्रचलित नियमाप्रमाणे अतिरिक्त मुख्य सचिवांकडून परवानगी घेऊनच केली आहे. अशा घटनांनी देशातील सर्वोत्तम पोलिस दलाची प्रतिमा मलिन होते आहे. पोलिसच बॉम्ब ठेवतात, खंडणी गोळा करतात किंवा थेट गृहमंत्र्यांविरूद्ध आरोप करतात. अशी स्थिती महाराष्ट्राने कधीही पाहिलेली नाही. या परिस्थितीतून महाराष्ट्र पोलिस दलाला बाहेर काढावेच लागेल, असंही ते म्हणाले.

फडणवीसांनी काय केले होते आरोप?

दरम्यान, गृहसचिवांना भेटायला जाण्यापूर्वी फडणवीस यांनी राज्यातील बदली रॅकेटचा पर्दाफाश केला होता. परमबीर सिंग हे तक्रार करणारे पहिले व्यक्ती नाहीत. डीजींनी यापूर्वी एक रिपोर्ट दिला आहे. यापूर्वी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी एक रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देण्यात आला होता. हा 6.3 जीबीचा डेटा आहे. त्या सर्व कॉल रेकॉर्ड आहे. मी मुख्यमंत्री असताना 2017 एका हॉटेलमध्ये काही डिलिंग सुरू असल्याचं कळलं होतं. तिथे काही पोलीस जात असल्याचं कळलं होतं. त्यामुळे पोलिसांनी तिथे धाड टाकली आणि सात ते आठ जणांना अटक केली. त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले. चार्जशीटही केलं. त्याच सीओआय आता आहेत. त्यांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी डीजीची परवानगी घेतली आणि काही लोकांचे नंबर इंटरसेप्शनवर लावले. त्यात काही पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे अनेक विस्फोटक संवाद समोर येऊ लागले. हे पाहिल्यानंतर त्यातनं खूप मोठं रॅकेट झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्याच्याशी गृहमंत्रालयाच्या लोकांचे संबंध दिसत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे सीओआय म्हणजे कमिशनर ऑफ इंटेलिजन्सने या प्रकरणाचा एक रिपोर्ट तयार केला. त्यांनी हा रिपोर्ट पोलीस महासंचालकांना दिला आणि नंतर तो मुख्यमंत्र्यांकडे गेला. 8 ऑगस्ट 2020मध्ये हा अहवाल देण्यात आला. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी हे सर्व ऐकून घेतलं, मात्र त्यावर काहीच कारवाई केली नाही, असं फडणवीस म्हणाले होते. (Devendra Fadnavis Submits ‘evidence’ Of Maha Police Transfer Racket To Home Secretary)

संबंधित बातम्या:

अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी काय करत होते?; फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

मला पवारांसारखं इंग्रजी येत नाही, टोला लगावत देवेंद्र फडणवीसांनी ‘ती’ प्रथा मोडली

ठाकरे सरकारवर देवेंद्र फडणवीसांचा डेटाबॉम्ब; पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

(Devendra Fadnavis Submits ‘evidence’ Of Maha Police Transfer Racket To Home Secretary)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.