तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाताना आता घ्यावी लागणार ही काळजी, मंदिर प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय

तिरुपती बालाजी मंदिरांच्या काही नियमांमुळे श्रद्धाळु नाराज झाले आहेत. गेल्या आठवड्यात येथे घडलेल्या एका बालीकेच्या मृत्यूनंतर मंदिर प्रशासन सावध झाले आहे.

तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाताना आता घ्यावी लागणार ही काळजी, मंदिर प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय
TIRUPATIImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 4:24 PM

हैदराबाद | 16 ऑगस्ट 2023 : तिरुमाला तिरुपती बाजाजी मंदिराच्या दर्शनासाठी लाखो भाविक जात असतात. तिरुपतीच्या दर्शनाला पायी जाताना भाविकांना आपल्या सोबत एक वस्तू सोबत ठेवावी लागणार आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी आता नवीन निर्णय घेतला आहे. त्यानूसार आता भाविकांना स्वत:ची काळजी घेण्यासाठी त्यांच्या सोबत एक लाकडी छडी ठेवावी लागणार आहे. तिरुपती मंदिर प्रशासनाच्यावतीने श्रद्धाळूंना हाजीमलंगला जाताना जसा सोबत काठी दिली जाते तशी लाकडी काठी दिली जाणार आहे.

तिरुपती बालाजीचे देवस्थान जगभरात प्रसिध्द असून जगभरातून येथे भाविक नवस करायला दरवर्षी येत असतात. परंतू गेल्या आठवड्यात येथील मंदिराचा पायवाट चढणाऱ्या एका सहा वर्षीय मुलीवर बिबट्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे यापुढे अशा घटनापासून वाचण्यासाठी पावले उचलली आहेत. पायी वाटेने जाताना आता शंभर भाविकांच्या मागे एक सुरक्षा गार्ड तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भाविकांना लाकडी छडी देण्याचा देखील निर्णय घेतला आहे.

जंगली जनावरांना आकर्षित होतील अशा खाण्यापिण्याच्या वस्तू कुठेही टाकू नये. तसेच खाद्यपदार्थांच्या दुकानदारांनाही कुठेही कचरा टाकू नये असे आदेश देण्यात आले आहेत. भाविकांनी माकडांना जेवण देऊ नये. पाऊल वाटेवर कुंपण लावण्याचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाला मंजूरीसाठी पाठविला असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

दुपारनंतर लहान मुलांना मनाई 

तिरुपती बालाजी मंदिरांच्या काही नियमांमुळे श्रद्धाळु नाराज झाले आहेत. आपल्या सहा वर्षांच्या मुलासह आलेल्या स्वाती किरण यांनी सांगितले की आम्ही दूरवरुन येथे येतो. जर दुपारी दोन नंतर लहान मुलांना प्रवेश दिला नाही तर आम्हाला पूर्ण रात्र वाट पहावी लागेल. आणि सकाळी पाच वाजता दर्शन मिळेल. हैदराबादचे एक श्रद्धाळू बालकृष्ण गौड यांनी म्हटले की भाविकांना रोखण्याऐवजी मंदिर प्रशासनाने सुरक्षा वाढवावी आणि मंदिर मार्गावर कुंपण बांधायला हवे असेही त्यांनी म्हटले आहे.

सहा वर्षांच्या बालिकेवर हल्ला

आपल्या पालकांसह दर्शनाला आलेली सहा वर्षीय लक्षिता वाट चुकल्याने बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. लक्षितावर हल्ला केल्याचा संशय असलेला बिबटा नंतर 48 तासांनी जेरबंद झाला. आता मार्गांवर तीस मीटरपर्यंत प्रकाश पसरणारे दिवे लावले जाणार आहेत. सीसीटीव्हींची संख्या वाढविण्यात येणार आहेत. तसेच वन्यपूश ट्रॅकर, ड्रोन कॅमेरे, चोवीस तास डॉक्टरांची नेमणूक केली जाणार आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.