Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gonda Train Accident: गोंडा रेल्वे अपघातात ‘कवच’ प्रणाली का काम करु शकली नाही? काय आहे अपघात रोखणारी ही प्रणाली

Dibrugarh Train Accident: सध्या भारतातील अनेक रेल्वे मार्गावरील कवच प्रणाली यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. जलपाईगुडी आणि गोंडा मार्गावरही प्रणाली बसलेली नाही. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सध्या दक्षिण मध्य रेल्वेच्या 1465 किमी मार्गावर आणि 139 इंजिनमध्ये कवच यंत्रणा बसवण्यात आली आहे.

Gonda Train Accident: गोंडा रेल्वे अपघातात 'कवच' प्रणाली का काम करु शकली नाही? काय आहे अपघात रोखणारी ही प्रणाली
Dibrugarh Train Accident
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 6:10 PM

Dibrugarh Train Accident: उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये गुरुवारी दुपारी मोठा रेल्वे अपघात झाला. डिब्रूगढ एक्सप्रेसचे सहा डब्बे पटरीवरुन उतरले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. हा अपघात गोरखपूरच्या रेल्वे विभागात झाला. अपघातानंतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर पोहचले. 11 रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला आहे. रेस्स्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे. या अपघातानंतर रेल्वेची कवच प्रणाली पुन्हा चर्चेत आली आहे. ही प्रणाली अपघात थांबण्यासाठी असताना हा अपघात कसा झाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काय आहे कवच सिस्टीम

कवच प्रणाली ही रेल्वे अपघात रोखण्यासाठी तयार केलेली एक सिस्टीम आहे. परंतु ही प्रणाली या आधी पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमध्ये रेल्वे अपघात रोखण्यात अपयशी ठरली. त्यानंतर आता गोंडा येथील दिब्रुगड एक्स्प्रेसमध्येही ही प्रणाली काम करु शकली नाही. भारतीय रेल्वेने रेल्वे अपघात रोखण्यासाठी कवच प्रणाली तयार केली आहे. रिसर्च डिझाईन आणि स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने ही एक स्वयंचलित प्रणाली तयार केली. 2012 मध्ये या प्रणालीवर काम सुरु झाली आणि त्याची पहिली चाचणी 2016 मध्ये घेण्यात आली. संपूर्ण भारतात ते ही प्रणाली बसवण्यात येणार आहे. ही प्रणाली म्हणजे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा संच आहे. यामध्ये रेल्वे, रेल्वे ट्रॅक, रेल्वे सिग्नल यंत्रणा आणि प्रत्येक स्थानकावर एक किलोमीटर अंतरावर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन यंत्रे बसवण्यात आली आहेत. सिस्टीममध्ये असलेली प्रत्येक गोष्ट अल्ट्रा हाय रेडिओ फ्रिक्वेंसीने काम करणार आहे.

कशी काम करणार ही प्रणाली

ट्रेनमधील चालक सिग्नल तोडून पुढे गेल्यास ही प्रणाली आपोआप कार्यान्वित होईल. प्रणालीद्वारे ट्रेनच्या चालकाला अलर्ट दिले जाईल. यानंतर कवच प्रणाली आपोआप ट्रेनचे ब्रेक नियंत्रित करेल. यावेळी कवच ​​प्रणालीला समोरून दुसरी गाडी रुळावर येत असल्याचे समजल्यावर आपोआप पहिली ट्रेन थांबवली जाईल. म्हणजेच रेल्वेच्या कोणत्याही एका ट्रॅकवर एकाच वेळी दोन गाड्या असतील तर ही प्रणाली सक्रिय होते. त्यामुळे दोन्ही गाड्या एकमेकांवर आदळण्यापासून थांबवतील.

हे सुद्धा वाचा

अजून काम अपूर्णच

सध्या भारतातील अनेक रेल्वे मार्गावरील कवच प्रणाली यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. जलपाईगुडी आणि गोंडा मार्गावरही प्रणाली बसलेली नाही. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सध्या दक्षिण मध्य रेल्वेच्या 1465 किमी मार्गावर आणि 139 इंजिनमध्ये कवच यंत्रणा बसवण्यात आली आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.