Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसची निवडणूक ऐतिहासिक ठरणार; डिजीटलपद्धतीने होणार अध्यक्षाची निवड

बिहार विधानसभा निवडणुकीतही मोठी हार पत्करावी लागल्याने आता काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षाच्या निवडीचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेसचा आगामी अध्यक्ष डिजीटल पद्धतीने निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Digital Voting in Congress, will rahul gandhi become new president?)

काँग्रेसची निवडणूक ऐतिहासिक ठरणार; डिजीटलपद्धतीने होणार अध्यक्षाची निवड
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 12:20 PM

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीतही मोठी हार पत्करावी लागल्याने आता काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षाच्या निवडीचे वारे वाहू लागले आहे. काँग्रेसचा आगामी अध्यक्ष डिजीटल पद्धतीने निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं असून पक्षाचा अध्यक्ष डिजीटलपद्धतीनेच निवडला जाणार असल्याचंही अधोरेखित झालं आहे. (Digital Voting in Congress, will rahul gandhi become new president?)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा अध्यक्ष डिजीटल पद्धतीने निवडण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी मंडळाला डिजीटल आयडी कार्ड जारी करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यासाठी सेंट्रल इलेक्शन ऑथोरिटीने मतदार यादीही तयार करण्यास सुरुवात केली आहे. या ऑथेरिटीने राज्यांमधील सर्व युनिट्सकडून एआयसीसी प्रतिनिधींचे डिजीटल फोटो मागवले आहेत. या निवडणुकीत सुमारे 1500 प्रतिनिधी भाग घेणार आहेत. दुसरीकडे राहुल गांधी यांनाच पुन्हा अध्यक्षपद देण्याची काँग्रेसकडून तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अन्य कुणी दावा केल्यास ही निवडणूक नाट्यमय वळण घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या निवडणुकीत राहुल गांधी विजयी झाल्यास तेच पक्षाचे निर्विवाद नेते असून सर्वात लोकप्रिय नेते असल्यावरही शिक्कामोर्तब होणार आहे. परंतु, अध्यक्षपदाचे दावेदार वाढल्यास सेंट्रल इलेक्शन ऑथोरिटीला पूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, राहुल गांधी हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

आम्ही अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पूर्ण तयारी करत आहोत. दोन राज्य वगळता आम्ही सर्व राज्यातील काँग्रेसच्या डेलिगेट्सची यादी मागवली आहे, असं निवडणूक प्रक्रियेशी संबंधित एका काँग्रेस नेत्याने सांगितलं. 2017 मध्ये जशी यादी होती, तशीच यादी यावेळीही असणार आहे. मात्र, ही यादी थोड्याफार फरकाने अद्ययावत करण्यात येत आहे. यावेळी प्रत्येक डेलिगेट्सच्या आयडी कार्डमध्ये बार कोड असेल. त्यात त्याची सर्व माहिती असेल. हे व्होटर आयडी कार्ड लवकरच संबंधितांना देण्यात येणार आहेत.

नव्याने निवडून आलेल्या अध्यक्षाचा कार्यकाळ दोन वर्षाचा असेल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांना पक्षाचे हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यामुळे या जागेवर निवडणूक होत आहे.

संबंधित बातम्या:

राम विलास पासवानांच्या रिक्त राज्यसभा जागेसाठी पोटनिवडणूक, रिंगणात कोण उतरणार?

मल्लिकार्जुन खर्गे यांचाही कपिल सिब्बल यांच्यावर निशाणा, काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप

(Digital Voting in Congress, will rahul gandhi become new president?)

जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.