Ram mandir : अयोध्यासाठी थेट विमानसेवा होणार सुरु, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Ram Mandir : 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार असून २३ जानेवारीपासून लोकांना दर्शन घेता येणार आहे. यासाठी विमान सेवा सुरु झाल्या आहेत. काही येत्या काही दिवसाचत सुरु होणार आहेत.
Ayodhya Ram mandir : 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाचा पवित्र नद्यांच्या पाण्याने अभिषेक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानंतर हे मंदिर सर्व भाविकांसाठी २३ जानेवारीपासून दर्शनासाठी खुले होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसापूर्वीच अयोध्येतील विमानतळाचं उद्घाटन केले होते. त्यानंतर आता येत्या काही दिवसात थेट अयोध्येसाठी विविध शहरातून विमान सेवा सुरु होणार आहे. राम मंदिरानंतर अयोध्येचे महत्त्व अधिक वाढले आहे. एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्या थेट अयोध्येसाठी विमान सेवा पुरवणार आहेत.
येत्या काही दिवसांत इतर विमान कंपन्याही विविध शहरांतून अयोध्येसाठी उड्डाणे सुरू करू शकतात. कारण आता अयोध्येत येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. स्पाईसजेटनेही अयोध्येसाठी उड्डाणे सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.
अयोध्येसाठी दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू आणि अहमदाबाद येथून थेट विमानसेवा सुरू होणार आहे. 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले होते. एअर इंडिया एक्सप्रेस 17 जानेवारीपासून बंगळुरू-अयोध्या आणि कोलकाता-अयोध्या या मार्गांवर उड्डाणे सुरू करणार आहेत. दिल्ली-अयोध्या मार्गावर एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमानही नियोजित आहे.
कसे असेल वेळापत्रक
दिल्ली ते अयोध्या – सकाळी १० वाजता वाजता बंगळुरू ते अयोध्या – सकाळी 8.05 ( 17 जानेवारीपासून ) कोलकाता ते अयोध्या – दुपारी 1.25 वाजता ( 17 जानेवारीपासून ) दिल्ली ते अयोध्या – सकाळी 11.55 वाजता मुंबई ते अयोध्या – दुपारी 12.30 वा ( 15 जानेवारीपासून ) अहमदाबाद ते अयोध्या – सकाळी 9.10 वा
अयोध्येसाठी वेषभूषा करुन आले प्रवास
अयोध्येला विमानाने प्रवास करण्यासाठी आलेले प्रवासी विविध वेशभूषा करुन आज अहमदाबाद विमानतळावर पोहोचले होते. भगवान राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची वेशभूषा करून विमानतळावर प्रवाशांची मने जिंकली. या प्रवाशांनी सहप्रवासी आणि केबिन क्रू सदस्यांना मिठाईही खाऊ घातली.
#WATCH | Gujarat: As the first flight for Ayodhya leaves from Ahmedabad, passengers arrive at the airport dressed as Lord Ram, Lakshman, Sita, and Hanuman. pic.twitter.com/3EviO4mxzV
— ANI (@ANI) January 11, 2024
दिल्लीहून विमान सेवा सुरु
दिल्लीहून अयोध्येसाठी विमानसेवा सुरु झाली आहे. मुंबईहून १५ जानेवारीपासून विमानसेवा सुरु होणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट (IX 1590) दिल्लीहून सकाळी 10 वाजता उड्डाण करेल आणि लँडिंगची वेळ सकाळी 11.20 आहे. त्याचप्रमाणे इंडिगो फ्लाइट (6E 2128) अयोध्येसाठी सकाळी 11.55 वाजता निघून दुपारी 1.15 वाजता पोहोचेल.