शरद पवार यांच्याबद्दल ‘तो’ दावा, लोकसभेत अमित शाह आणि सुप्रिया सुळे यांच्यात जोरदार खडाजंगी, नेमकं काय घडलं?

लोकसभेत अमित शाह आणि सुप्रिया सुळे यांच्यातही खडाजंगी बघायला मिळाली. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या आरोपांवर अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबद्दल मोठा दावा केला. त्यानंतर अमित शाह आणि सुप्रिया सुळे यांच्यात लोकसभेत खडाजंगी झाली.

शरद पवार यांच्याबद्दल 'तो' दावा, लोकसभेत अमित शाह आणि सुप्रिया सुळे यांच्यात जोरदार खडाजंगी, नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 7:50 PM

नवी दिल्ली | 9 ऑगस्ट 2023 : लोकसभेत विरोधकांनी आज अविश्वासाचा प्रस्ताव सादर केलाय. त्यामुळे लोकसभेतील वातावरण आज चांगलंच गरम झालेलं बघायला मिळालं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज धडाकेबाज भाषण केलं. त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. राहुल गांधी यांनी मणिपूरच्या घटनेवरुन भाजपवर सडकून टीका केली. राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर महाराष्ट्रात सरकार पाडण्याचा आरोप केला.

सुप्रिया सुळे यांच्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी अमित शाह आणि सुप्रिया सुळे यांच्या जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. “सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, आम्ही सरकार पाडलं. महाराष्ट्रात सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार पाडलं. त्यांनी वसंत दादा पाटील यांचं सरकार पाडून भारतीय जनसंघ पक्षाचं समर्थन घेऊन ते मुख्यमंत्री बनले होते. भारतीय जनसंघ, भारतीय जनता पक्ष नाही”, असं अमित शाह म्हणाले.

अमित शाह आणि सुप्रिया सुळे यांच्यात खडाजंगी

अमित शाह यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसण्याची विनंती केली. तर अमित शाह यांनी सुप्रिया सुळे यांना बोलू द्या, असं सांगितलं. “एम. जोशी त्यावेळी कनविनियर होते”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यावर अमित शाह यांनी “कनविनियर ठीक आहे. पण मुख्यमंत्री कोण बनलं? सत्ता कुणाकडे होती? सत्ता कुणी भोगली? शरद पवारांनी”, असं प्रत्युत्तर दिलं.

अमित शाह यांच्याकडून इंदिरा गांधी यांचा उल्लेख

“गौरव गोगाई यांनी संस्था तोडल्या जात आहेत, असा आरोप केला. मी त्यांना सांगू इच्छितो, इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या चार जजला बायपास करुन हंसराज खन्ना यांना जज बनवण्यात आलं. सीएजीला सरकारी कामकाजांपासून दूर ठेवण्याचं काम इंदिरा गांधी यांनी केलं. जेएनयूवर टाळं लावण्याचं काम इंदिरा गांधी यांनी केलं होतं. यूपीएससी सारखी स्वायत्त संस्थेचे अधिकार हिसकावण्याचं काम इंदिरा गांधी यांनी केलं होतं. तुम्हाला इतिहास माहिती नाही”, असं अमित शाह म्हणाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.