Dnyanvapi Mosque : एमआयएम नेते दानिश कुरेशीला अटक, कथित ‘शिवलिंगा’बाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कारवाई

दानिश कुरेशी यांना अहमदाबाद सायबर क्राईमकडून अटक करण्यात आली आहे. कुरेशी यांनी आपल्या ट्वीटमध्ये ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान आढळून आलेल्या कथित शिंवलिंगाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी त्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.

Dnyanvapi Mosque : एमआयएम नेते दानिश कुरेशीला अटक, कथित 'शिवलिंगा'बाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कारवाई
ज्ञानवापी मशिदीतील कथित शिवलिंग प्रकरणात एमआयएम नेता दानिश कुरेशीला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 10:57 PM

नवी दिल्ली : गुजरातमध्ये अहमदाबाद पोलिसांनी असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मस्लिमीन अर्थात एमआयएमचे नेते दानिश कुरेशी (Danish Kureshi) यांना अटक केली आहे. दानिश कुरेशी यांच्यावर वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षण प्रकरणात कथित ‘शिवलिंग’बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. दानिश कुरेशी यांना अहमदाबाद सायबर क्राईमकडून (Cyber Crime) अटक करण्यात आली आहे. कुरेशी यांनी आपल्या ट्वीटमध्ये ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान आढळून आलेल्या कथित शिंवलिंगाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी त्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.

दानिश कुरेशी यांच्या ट्वीटमुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, असं पोलिसांचं मत आहे. सायबर क्राईमचे सहाय्यक पोलीस आयुक्त जेएम यादव यांनी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की आमच्या टीमने दानिश कुरेशी यांनी पोस्ट केलेलं ट्वीट शोधून काढलं. त्यांच्या ट्वीटमधील कंन्टेंटमुळे बहुसंख्य समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यानंतर सायबर क्राईमकडून या ट्वीटर हँडलची तांत्रिक तपासणी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

धार्मिक भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल

एमआयएम नेते दानिश कुरेशी यांना अहमदाबाद सायबर क्राईमच्या पथकानं शाहपूरमधून अटक केली आहे. त्यांच्याविरोधात जातीय सलोखा भडकवल्याबद्दल आणि धार्मिक भावना दुखावल्याबद्दल विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. नरोडा आणि पालडी अशा दोन ठिकाणी त्यांच्याविरोधात स्वतंत्र तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय.

‘दानिश कुरेशी यांनी हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी’

दानिश कुरेशी यांच्या ट्वीटबाबत हिंदू साधू डॉ. ज्योतिनाथ स्वामी यांनी निषेध व्यक्त केलाय. तसंच एमआयएम नेत्यावर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. त्याचबरोबर दानिश कुरेशी यांनी हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केलीय.

वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावेळी शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाच्या वकिलांनी केला आहे. न्यायालयाकडून कथिल शिवलिंगाची जागा सील करण्याचे आणि त्याला सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाकडून मशिदीत नमाज पठण करण्याची परवानगी दिली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.