Ayodhya : राम मंदिरात विराजमान रामलल्लाच्या मूर्तीचे हे रहस्य तु्म्हाला माहितीये का?
Ram mandir idol : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले आहेत. आज त्या मूर्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मूर्तीचे फोटो मनमोहक आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सांगितले की, गुरुवारी (१८ जानेवारी) रामललाची मूर्ती गर्भगृहात बसवण्यात आली आहे.
Ayodhya Ram mandir : अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचा अभिषेक सोमवारी 22 जानेवारी रोजी होणार आहे. मूर्ती आज गर्भगृहात विराजमान झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते सोमवारी तिची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामलल्लाच्या मूर्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मूर्तीची उंची 51 इंच आणि वजन 200 किलो आहे. गर्भगृहात स्थापित केलेली मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे, जी 22 जानेवारीला अभिषेक झाल्यानंतर काढली जाणार आहे.
काय आहे रामललाच्या मूर्तीचे रहस्य?
रामललाच्या मूर्तीच्या बाजुला भगवान विष्णूचे 10 अवतार पाहायला मिळत आहेत. हे दहा अवतार म्हणजे मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की असे आहेत. मूर्तीच्या खालच्या बाजूला एका बाजूला हनुमान तर दुसऱ्या बाजूला गरूड दिसत आहे. रामललाच्या मूर्तीच्या मुकुटाच्या बाजुला सूर्यदेव, शंख, स्वस्तिक, चक्र आणि गदा दिसत आहे. रामललाची मूर्ती केवळ आकर्षकच नाही, तर त्यावर केलेली कलाकृतीही सुंदर आहे. काळ्या पाषाणात बनवलेल्या मूर्तीमध्ये डाव्या हाताला धनुष्यबाण धरण्याच्या मुद्रेत आहे. उजवा हात आशीर्वाद स्थितीत आहे.
22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा
22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठादरम्यान रामललाच्या मूर्तीवरून कापड काढण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोन्याच्या सुईने डोळ्यात अँटिमनी लावणार आहे. त्यानंतर त्यांना आरसा दाखवतील. कर्नाटकचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती तयार केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही मूर्ती बनवण्यासाठी फक्त एकाच दगडाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या मूर्तीचे आयुष्य हजार वर्षांपेक्षा जास्त आहे. यावर पाणी किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही. या मूर्तीची हानी देखील होणार नाही.
किती वाजता आहे मुहूर्त
राम मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जानेवारीपर्यंत विधी सुरू राहणार असून प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आवश्यक ते सर्व विधी केले जातील. 121 ‘आचार्य’ विधी करत आहेत. राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ कार्यक्रम 22 जानेवारी रोजी दुपारी 12.20 वाजता सुरू होईल आणि दुपारी 1 वाजता संपेल.