Explained : Lancet च्या रिसर्चमुळे घाबरू नका, खुल्या हवेत कोरोनाचा संसर्ग होत नाही; जाणून घ्या चूक काय बरोबर काय ?

लान्सेटने कोरोना हवेतून पसरतो असे सांगिते आहे. लान्सेटच्या या दाव्यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. (corona spread through air lancet research)

Explained : Lancet च्या रिसर्चमुळे घाबरू नका, खुल्या हवेत कोरोनाचा संसर्ग होत नाही; जाणून घ्या चूक काय बरोबर काय ?
भारतात आलेल्या या ट्रिपल म्युटंट कोरोना विषाणूचं नाव B.1.618 असं ठेवण्यात आलंय. याआधी डबल म्युटंट कोरोना विषाणू आला होता त्याचं नाव B.1.617 असं ठेवण्यात आलं होतं. हा नवा ट्रिपल म्युटंट कोरोना विषाणू अधिक धोकादायक मानला जातोय.
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 12:13 AM

मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. रोज हजारो नवे रुग्ण आढळत असल्यामुळे चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर इंटरनॅशनल हेल्थ रिसर्च जर्नल लान्सेटने (Lancet research) मोठा दावा केला आहे. लान्सेटने कोरोना हवेतून पसरतो असे सांगितले आहे. लान्सेटच्या या दाव्यामुळे अनेकांची झोप उडालीये. लान्सेटने हवेतून कोरोना पसरतो हा रिसर्च करण्याआधी वेगवेगळे 10 परिमाण घेतले आहेत. त्यावर त्यांनी अभ्यास केलेला आहे. याच अभ्यासाच्या आधारे लान्सेटने सध्याची आपली कोरोनाशी लढा देण्याची पद्धत बदलायला हवी असे मत मांडले आहे. मात्र, हवेतून कोरोना पसरतो म्हणजे काय ?, खरंच लान्सेटच्या दाव्यात सत्यता आहे का ?, असे प्रश्नसुद्धा अनेकांना पडले आहेत. याच कारणामुळे आपण लान्सेटचा नवा रिसर्च आणि त्याबद्दल वेगवेगळ्या तज्ज्ञांची मतं जाणून घेऊया. (does Corona can spread through air expert comments on Lancet research)

संसर्ग पसरणे म्हणजे नेमकं काय ?

कोरोनाचा प्रसार समजून घ्यायचा असेल तर सुरुवातीला कोरोना संसर्ग म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. खोकला, शिंक, नाक किंवा तोंडावाटे बाहेर पडलेल्या ड्रॉपलेल्ट्सच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, या सिद्धांताला जगभरात मान्यता आहे. कोरोनाग्रस्त व्यक्ती किंवा कोरोना विषाणू यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या वस्तू जसे कागद, कपडे, फर्निचर, दरवाजा, भिंत अशा प्रकारच्या वस्तूंच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. ड्रॉपलेट्सच्या संपर्कात येण्यापासून वाचायचे असेल तर चेहऱ्यावर मास्क लावणे हा एक प्रभावी अपाय असल्याचे सांगण्यात येत आहे.

लान्सेटचा रिसर्च काय आहे ?

लान्सेटने कोरोना संसर्गावर अभ्यास केला आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात हवेतून होतो असं लान्सेटने म्हटलंय. त्यासाठी लान्सेटने वेगवेळे 10 परिमाण घेतले आहेत. उदाहरणादाखल त्यांनी सुपरस्प्रेडर हे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरवतात तसेच  ते ड्रॉपलेट्सच्या ऐवजी हवेतून संसर्ग पसरवात, असं लान्सेटने सांगितलं आहे. तसेच विलगीकरणासाठी असलेल्या हॉटेल्समध्ये दोन खोल्या आजूबाजूला असल्यास एकमेकांच्या रुममध्ये न जातासुद्धा संसर्ग झाल्याचे काही उदाहरण समोर आल्याचे लान्सेटने सांगितलंय. तसेच ड्रॉपलेट्सपासून वाचण्यासाठी डॉक्टर तसेच अनेक सामान्य व्यक्ती पीपीई किट वापरतात. मात्र, तरीसुद्धा त्यांना कोरोनाची लागण होते, असेसुद्धा लान्सेटने म्हटले आहे. हवेतून कोरोना संसर्ग होतो हे सांगण्यासाठी लान्सेटने हे उदाहरणं दिले आहेत.

एक्सपर्ट काय म्हणतात ?

लान्सेटने हा रिसर्च केल्यानंतर अनेकांनी वेगवेगळी मतं नोंदवली आहेत. अमेरिका येथील मेरीलँड युनिव्हर्सीटी रुग्णालय (University of Maryland Hospital) येथील संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ. फहीम युनूस (Dr. Faheem Younus) यांनीसुद्धा कोरोना संसर्गावर भाष्य केले आहे. त्यांनी हवेतून कोरोना पसरतो म्हणजे नेमकं काय होतं ? याबाबत सांगितलं आहे.

पार्क आणि समुद्र सुरक्षित ठिकाण

डॉ. फहीम युनूस यांनी ट्विट करुन सांगितलंय की “हवेतून कोरोना पसरतो म्हणजे बाहेरची हवा दूषीत आहे; असा त्याचा अर्थ होत नाही. बंद ठिकाणी कोरोना व्हायरसचा जास्त धोका असतो. बीच, समुद्र किनारा तसेच पार्क हे सुरक्षित ठिकाण आहेत. या ठिकाणी 6 फुटांचे अतंर ठेवून फिरता येऊ शकतं,” असं युनूस यांनी सांगितलंय.

खुल्या हवेत कोरोना पसरत नाही

आम्ही डॉ. फहीम यांनी सांगिलेली माहिती श्वसन विकार तज्ज्ञ डॉ. पीबी मिश्रा यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न केला. हेसुद्धा कोरोना रुग्णावर उपचार करतात. त्यांनी सांगितलंय की कोरोना खुल्या हवेत पसरत नाही. डॉ. फहीम यांनासुद्धा हेच सांगायचे असेल असं मिश्रा यांनी म्हटलंय. बंद खोलीमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. बाहेरची हवा स्थिर नसते. ती खेळती असते. तर हॉटेल, रुग्णालय, बंद खोली येथील हवा कोंडलेली असते. त्यामुळे अशा ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असं लान्सेटने केलेल्या स्टडीमधून सांगायचं असावं, असं मिश्रा यांनी सांगितलंय.

तसेच, ज्या हवेमध्ये कोरोनाचा विषाणू असेल अशीच हवा करोनाचा प्रसार करते. रुग्णालय, हॉटेल्सच्या वातावरणात कोरोनाचा संसर्ग हवेतून होऊ शकतो. मात्र, खुल्या आणि ताज्या हवेतून हे शक्य नाही, असेही मिश्रा यांनी सांगितलंय.

चिंता करु नाक मास्क वापरा

लान्सेटचा अहवाल आल्यानंतर अनेकजण चिंताग्रस्त झाले आहेत. यावर बोलताना डॉ. फहीम युनूस यांनी घाबरण्याची गरज नसल्याचं सांगितलं आहे. कापडाचे मास्क फेकून देऊन N95 किंवा KN95 मास्क वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच हे मास्क धुवूनसुद्धा घालता येतील असंसुद्धा डॉ. युनूस यांनी म्हटलंय.

इतर बातम्या :

Maharashtra Lockdown Update | ‘मुख्यमंत्री काही दिवस परिस्थिती पाहतील, नंतर लॉकडाऊनवर निर्णय’; मंत्र्याचे मोठे वक्तव्य

(does Corona can spread through air expert comments on Lancet research)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.