गौतम गंभीर यांच्याकडे औषधे वाटप करण्याचं लायसन्स आहे काय?; कोर्टाचा ‘गंभीर’ सवाल
भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी कोरोनावरील फॅबीफ्ल्यू औषधांचं वाटप केलं आहे. (Does Gautam Gambhir have license to deal in Covid-19 drugs, asks Delhi High Court)
नवी दिल्ली: भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी कोरोनावरील फॅबीफ्ल्यू औषधांचं वाटप केलं आहे. त्याची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. कोरोनाचं औषध वाटप करायला गौतम गंभीर यांच्याकडे लायसन्स आहे काय?, औषधांचं वाटप करण्यापूर्वी गंभीर यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला होता काय? असा सवाल कोर्टाने केला आहे. (Does Gautam Gambhir have license to deal in Covid-19 drugs, asks Delhi High Court)
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विपीन सांघी आणि रेखा पल्ली यांच्या खंडपीठासमोर एका याचिकेवर सुनावणी सुरू होती. त्यावेळी कोर्टाने हा सवाल केला. लायसन्स नसताना कोणत्याही व्यक्तिला औषधांचं वाटप करण्याची परवानगी कशी मिळू शकते. औषधे विकण्यासाठी परवान्याची आवश्यकता असते. औषधे वाटण्यासाठीही गौतम गंभीर यांनी लायसन्स घेतलं होतं का? ते कोणत्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांचं वाटप करत होते? असा सवाल कोर्टाने केला आहे.
काम चांगलं पण…
गौतम गंभीर यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा असल्याने त्यावरही कोर्टाने आश्चर्य व्यक्त केलं आहे. या आधी दिल्ली सरकारच्या वकिलाने कोर्टात याबाबतची माहिती दिली होती. लोकांना फॅबीफ्ल्यू औषध मिळत नसताना एक नेता सर्रासपणे फॅबीफ्ल्यू औषधांचं मोफत वाटप करत आहे, असं या वकिलाने म्हटलं होतं. त्यावर हे काम चांगलं आहे. पण पद्धत चांगली नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे.
25 एप्रिलपासून औषधांचं वाटप
गौतम गंभीर यांनी 25 एप्रिल रोजी दिल्लीकरांना फॅबीफ्ल्यूचं औषध वाटप करण्याची घोषणा केली होती. तसेच लोकांना ऑक्सिजन सिलिंडर वाटप करण्यात येणार असल्याचीही घोषणा केली होती. त्यानुसार 22 पुसा रोडवरील त्यांच्या कार्यालयातून सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत औषधांचं वाटप केलं जात होतं.
कोरोना बळींची संख्या वाढली
दरम्यान, देशात गेल्या चोवीस तासात भारतात 3 हजार 293 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाने एकाच दिवशी 3 हजार रुग्णांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 3,60,960 नवे रुग्ण सापडले आहेत.
कोणत्या राज्यात किती रुग्ण?
महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 66,358 नवे रुग्ण सापडले असून कोरोनामुळे 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात चोवीस तासात 32,993 नवे रुग्ण सापडले आहेत. केरळमध्ये 32,819, कर्नाटकात 31,830 आणि राजधानी दिल्लीत कोरोनाचे 24,149 नवे रुग्ण सापडले आहेत. दिल्लीत गेल्या चोवीस तासात 381 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 29,78,709 झाली आहे. देशात आतापर्यंत 14.78 कोटी कोरोना लसीकरण करण्यात आलं आहे. तसेच आजपासून 18-45 दरम्यानच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी केली जात आहे. 18 वर्षांवरील लोकांना येत्या 1 मे पासून लस देण्यात येणार आहे. (Does Gautam Gambhir have license to deal in Covid-19 drugs, asks Delhi High Court)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 28 April 2021 https://t.co/lna7QLYkTQ #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 28, 2021
संबंधित बातम्या:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुलती नर्मदाबेन मोदी यांचं कोरोनाने निधन
(Does Gautam Gambhir have license to deal in Covid-19 drugs, asks Delhi High Court)