PK on Nitish: विरोधकांसोबत चहा प्यायल्याने एकजूट होत नाही, नितीशकुमार यांच्या दिल्ली दौऱ्यावर प्रशांत किशोर यांची काय टीका?
राज्यात अनेक पक्षांच्या युत्या, आघाड्या पाहिल्यात. मात्र मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर नितीशकुमारच दिसतात, असे पीके म्हणाले आहेत. भाजपाशी आघाडी आणि काडीमोड केला तरी नितीश यांनी सीएमपदाची खुर्ची सोडलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला नितीशकुमार चिकटून बसलेले आहेत, अशी टीकाही पीकेंनी केली आहे.
नवी दिल्ली- बिहारमध्ये भाजपाची (BJP) साथ सोडून महाआघाडीचा प्रयोग करणाऱ्या मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar)यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकांचे वेध लागलेले आहेत. त्यासाठी त्यांनी नुकताच ती दिवसांचा दिल्ली दौरा केला आहे. यात त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासमोर विरोधकांची महाआघाडी करुन त्याचे आव्हान उभे करण्याची त्यांची रणनीती आहे. मात्र त्यांच्या या दौऱ्यावर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor)यांनी टीका केली आहे. चार नेत्यांना भेटल्याने आणि त्यांच्यासोबत चहा प्यायल्याने काहीही फरक पडणार नाही, असे वक्तव्य प्रशांत किशोर यांनी केले आहे. यामुळे विरोधकांची एकजूट सिद्ध होणार नाही, अशी टीका ही त्यांनी केली आहे.
नितीश कुमार यांच्या दिल्ली दौऱ्याचे अनेक अर्थ काढण्यात येत आहेत. मात्र या घटनेने राष्ट्रीय राजकारणावर फारसा फरक पडणार नाही, असे मतही प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे.
Need credible face to seek votes in 2024 LS polls, meeting leaders won’t make difference: Prashant Kishor
Read @ANI Story | https://t.co/3L5EgFqASx #PrashantKishor pic.twitter.com/EgZ8NCnOFk
— ANI Digital (@ani_digital) September 10, 2022
नितीशकुमार खुर्चीला चिकटून असल्याची टीका
त्यांनी बिहारच्या राजकारणावरही भाष्य केले आहे. राज्यात अनेक पक्षांच्या युत्या, आघाड्या पाहिल्यात. मात्र मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर नितीशकुमारच दिसतात, असे पीके म्हणाले आहेत. भाजपाशी आघाडी आणि काडीमोड केला तरी नितीश यांनी सीएमपदाची खुर्ची सोडलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला नितीशकुमार चिकटून बसलेले आहेत, अशी टीकाही पीकेंनी केली आहे. फेव्हिकॉल कंपीनीने त्यांना आपले ब्रँड एम्बेसेड केले पाहिजे, असेही पीके म्हणाले आहेत.
बिहारमध्ये सरकार बदलल्याचा परिणाम इतर राज्यांवर नाही
बिहारमध्ये भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा नितीश यांचा निर्णय हा राज्यापुरता मर्यादित आहे. याचा परिणाम इतर राज्यांवर होणार नाही, असेही पीके म्हणाले आहेत. यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे उदाहरण दिले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते, तिथे आता एनडीएचे सरकार आले असले तरी त्याचा परिणाम देशातील इतर राज्यांवर होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.