मुंबई – सध्या राज्यात सत्ताबदलाकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत किती आमदार आहेत, आता ते राज्यपालांना कधी भेटणार, मुख्यमंत्री राजीनामा कधी देणार, नवे सत्तेचे समीकरण कसे असणार, नव्या सरकारचा शपथविधी कधी असणार, हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत, आणि सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे, मात्र त्याहून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सध्या राज्यसभरातील पावसाचा. राज्यात अनेक भागात अजून पाऊस (Monsoon)पोहचलेला नाही, त्यामुळे राज्यभरातील शेतकरी चिंतेत आहेत. राज्यातील मुंबई, पुण्यासारख्या शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात (Dams in Maharashtra)अद्याप पावसाला सुरुवातही झालेली नाही. धरण साठ्यांत अत्यंत कमी पाणीसाठी शिल्लक राहिलेला आहे. पुढील महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठी साधरणपणे शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात आहे. जून संपत आला तरी अद्याप पाऊस सुरु न झाल्याने चिंतेचे ढग दाटायला सुरुवात झालेली आहे. राज्यात पुढील महिनाभरात पाऊस झाला नाही, तर दुष्काळाचं सावटं (Drought condition)राज्यावर असल्याचे तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर असे सांगत आहेत.
प्रशांत महासागराच्या विषुवृत्तावर सरासरी तापमानात ऑगस्ट २०२० पासून घट पाहायला मिळते आहे. सरासरी तापना उणे ०.५ अंश सेल्सिअसच्या खाली राहत असल्याचे या स्थितीला ला निना अशी परिस्थिती म्हणतात. असे झाल्यास भारतीय उपखंडात चांगला पाऊस पडत असतो, असा गेल्या दोन वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे यंदाही जानेवारीत चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तसेच सद्य परिस्थितीत पुढील नोव्हेंबर २०२२ पर्यंत ला निनाच स्थिती असेल असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. नोव्हेंबर २०२२ पर्यंत हे तापमान उणे ०.८ अंश सेल्सिअसपर्यंत येईल असे औँधकर यांनी सांगितले आहे.
दुसरीक़डे क्लायमेट प्रोडिक्शन सेंटर-इंटरनॅशनल प्रोडक्शन इन्स्टिट्यूट यांच्या अंदाजानुसार ला निना परिस्थिती जूनमध्ये ९५ टक्के होती, ती जुलैमध्ये ६५ टक्क्यांवर येईल, जुलै ते डिसेंबरदरम्यान ही स्थिती ५२ ते ५८ टक्के असण्याची शक्यता आहे.
भारतीय हिंद महासागरातील विषुवृत्तावरील पूर्व आणि पशअचिम भागातील तापमानाची नोंद सातत्याने घेतली जाते. या निरीक्षणाला इंडियन ओशन डायपोल इंडेक्स ( हिंदी महासागर द्विध्रुव) असे म्हटले जाते. २१ जून २०२२च्या नोंदीनुसार हिंदी महासागर द्विध्रुव सध्या तटस्थ आहे. हा निर्देशांक गेल्या काही महिन्यांपासून शून्याच्या खाली आहे. हा नकारात्मक द्विध्रुव उणे ०.४ च्या घरात आहे. जागतिक पातळीवरील सर्व हवामानाचे अंदाज हा द्विध्रुव नोवहेंबरपर्यंत नकारात्मक राहिल असेच सांगत आहेत.
भारताच्या दक्षिणेला असलेल्या हिंद महासागरातील विषुवृत्तावरील पश्चिम भागातील (अफ्रिका, मादागास्कर) तापमान हे जर पूर्व भागातील (इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया) पेक्षा जास्त असेल तर त्याला अधिक (+) आयओडी फेज असे म्हणतात. तर याच्या उलट स्थिती असेल आणि पश्चिम भागातील तापमान हे पूर्व भागापेक्षा कमी असेल तर त्याला उणे आयओडी फेज असे म्हणतात. हा आयओडी जर अधिक असेल तर देशात चांगला पाऊस होत असतो. आणि आयओडी कमी असेल म्हणजेच उणे असेल तर त्यामुळे पावसाचे प्रमाण अत्यल्प होत असते. सध्या हा आयओडी म्हणजेच द्विध्रुव उणे असल्याने देशात दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची स्थिती असल्याचे मत तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी नोंदवलेले आहे.
ला नीना परिस्थिती भारतातील पावसाळ्यासाठी पोषक असली, तरी आयओडी म्हणजेच द्विध्रुव स्थिती ही उणे असल्याने, पावसाची शक्यता कमी असल्याचे औँधकर यांचे म्हणणे आहे. यंदा पाऊस कमी किंवा अत्यल्प पडण्याची शक्यता जास्त असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातही मध्य आणि उत्तर महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.