Republic Day | पथसंचलन पाहण्यासाठी फक्त 24 हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था, प्रजासत्ताक दिनी यंत्रणा अलर्टवर
26 जानेवारी रोजी नवी दिल्लीत (Delhi) राजपथावर शानदार संचलन होणार आहे. मात्र या पथसंचलनात फक्त 24 हजार लोक उपस्थित राहणार आहेत. मागील वर्षी या कार्यक्रमासाठी 25 हजार लोकांना बसण्याची सोय करण्यात आली होती.
नवी दिल्ली : देशात कोरोनाची (Corona) तिसरी लाट थैमान घालत आहे. रोज लाखो नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन सरकार तसेच आरोग्य विभागाकडून केले जात आहे. तसेच वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमांवरदेखील निर्बंध आणण्यात आले आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला (Republic Day) म्हणजेच 26 जानेवारी रोजी नवी दिल्लीत (Delhi) राजपथावर शानदार संचलन होणार आहे. मात्र पथसंचलनाचा हा सोहळा पाहण्यासाठी फक्त 24 हजार लोक उपस्थित राहणार आहेत. मागील वर्षी या कार्यक्रमासाठी 25 हजार लोकांना बसण्याची सोय करण्यात आली होती. मात्र कोरोना तसेच सुरक्षेच्या कारणामुळे यंदा फक्त 24 हजार लोकांना उपस्थित राहता येणार आहे.
संचलन पाहण्यासाठी 24 हजार लोकांना उपस्थित राहण्याची मुभा
देशात सध्या कोरोनाचा कहर वाढला आहे. तिसरी लाट हाताच्या बाहेर जाऊ नये म्हणून लसीकरण तसेच प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. मात्र दिल्लीमधील राजपथावर होणाऱ्या शानदार संचलनाचा नेत्रदिपक सोहळा पाहण्यासाठी फक्त 24 हजार लोकांना उपस्थित राहता येणार आहे. कोरोनामुळे या कार्यक्रमासाठी राहणाऱ्या लोकांच्या संख्येवर निर्बंध आणण्यात आहे आहेत. दुसरीकडे विविध देशातील प्रमुख पाहुणेही यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला उपस्थित असणार नाहीत. गेल्यावर्षी 26 जानेवारी रोजी 25 हजार लोकांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. मात्र यावेळी फक्त 24 हजार लोकांनाच बसण्याची सोय करण्यात आली आहे.
गाझीपूर भागात सापडले IED स्फोटकं
दुसरीकडे काही दिवसांपूर्वी लोकांची गजबज असलेल्या दिल्लीच्या गाझीपूर या भागात IED स्फोटकं सापडले होते. प्रजासत्ताक दिन तोंडावर असताना 14 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. त्यानंतर येथे स्पेशल सेलचे अधिकारी तसेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड या विशेष दहशतवाद विरोधी दलाचे अधिकारीदेखील घटनास्थळी हजर झाले होते. या घटनेमुळेही सरकार सतर्क झाले असून यंदाच्या प्रजासत्ताक दिनी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.
इतर बातम्या :
Nawab Malik | जिंदगी झंड बा ,फिर भी घमंड बा; भाजप नेते रवी किशन यांची नवाब मलिकांनी उडवली खिल्ली