चंदीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ (Mann ki Baat) कार्यक्रमाचा 100 वा भाग न ऐकल्याबद्दल चंदीगडच्या पीजीआयने (Chadigarh PGI) नर्सिंगच्या 36 विद्यार्थ्यांना 7 दिवसांसाठी हॉस्टेल आणि PGI मधून बाहेर जाण्यास बंदी करण्यात (Outing of Nursing students Banned) आली आहे. सर्व नर्सिंग विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ ऐकावी असे लेखी आदेश पीजीआयने जारी केले होते, परंतु तृतीय वर्षाच्या नर्सिंगच्या 28 विद्यार्थ्यांनी आणि प्रथम वर्षाच्या नर्सिंगच्या 8 विद्यार्थ्यांनी ते ऐकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदींचा ‘मन की बात’ कार्यक्रम न ऐकणाऱ्या विद्यार्थिनींचे बाहेर जाणे बंद केल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, पीजीआय चंदीगडने एक आदेश जारी केला आहे की विद्यार्थ्यांना ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्यास सांगितले होते, परंतु काही विद्यार्थ्यांनी ते ऐकले नाही. याबाबत 36 विद्यार्थिनींचे बाहेर पडणे (Outing of Nursing students Banned) 7 दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. पीजीआय चंदीगडने यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
चंदिगड पीजीआयने केला आदेश जारी
पीजीआयने एक आदेश जारी केला. त्यानुसार, 30 एप्रिल रोजी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्यास सांगितले होते. नियमित अभ्यासक्रम म्हणून त्यात सहभागी व्हावे या उद्देशाने ही सूचना देण्यात आली होती. कार्यक्रमाच्या आधीच्या भागात पंतप्रधान हे अवयवदानाच्या उदात्त हेतूला चालना देण्याबद्गल बोलले होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनी होत्या अनुपस्थित
यावेळी काही विद्यार्थी हा कार्यक्रम ऐकण्यास आल्या नाही व त्यांनी गैरहजर राहण्याचे काही कारणही दिले नाही. त्यामुळे कॉलेज प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई केल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यांना पीजीआयएमईआर प्रशासनाच्या नाराजीची माहिती दिली आहे.