Israel-Hamas War | धक्कादायक! भारतातील एका रॅलीला हमास नेत्याची हजेरी, ‘हिंदुत्व उखडून फेकण्याची’ घोषणा

Israel-Hamas War | सध्या सगळ्या जगाच लक्ष इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाकडे लागलं आहे. इस्रायल हमासचे दहशतवादी आणि नेत्यांना टार्गेट करत असताना हमासचा एक नेता भारतातील रॅलीला उपस्थित होता. त्यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ही रॅली कुठे झाली? हा नेता तिथे कसा आला? या बद्दल जाणून घेऊया.

Israel-Hamas War | धक्कादायक! भारतातील एका रॅलीला हमास नेत्याची हजेरी, 'हिंदुत्व उखडून फेकण्याची' घोषणा
hamas leader khaled mashal
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 12:23 PM

कोची : सध्या गाजा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. इस्रायल वेचून वेचून हमासचे दहशतवादी आणि नेत्यांना संपवत आहे. या दरम्यान हमासचा एक नेता भारतात झालेल्या रॅलीला उपस्थित असल्याची माहिती आहे, हा नेता प्रत्यक्ष आला नव्हता, पण तो व्हर्च्युअल म्हणजे ऑनलाइन हजर होता. त्याने रॅलीला संबोधित केलं. हमासच्या या नेत्याच नाव खालिद मशेल आहे. ही माहिती समोर आल्यानंतर भाजपाकडून कारवाईची मागणी करण्यात आलीय. खालिद मशेल शुक्रवारी केरळच्या मलप्पुरममध्ये सॉलिडेरिटी युवा आंदोलनने आयोजित केलेल्या युवा प्रतिरोध रॅलीत व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित होता. एकजुटता युवा आंदोलन ही जमात-ए-इस्लामीची यूथ विंग आहे. त्यांनी या रॅलीच मलप्पुरममध्ये आयोजन केलं होतं.

या रॅलीत बुलडोजर हिंदुत्व आणि रंगभेद यहुदीवाद उखडून फेकण्याच्या घोषणा देण्यात आल्या. भाजपा प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांनी हमास नेता सहभागी झाल्याने कारवाईची मागणी केलीय. “सॉलिडेरिटी कार्यक्रमात हमास नेता खालिद मशेलची ऑनलाइन उपस्थिती चिंताजनक बाब आहे. कुठे आहेत केरळचे मुख्यमंत्री? केरळ पोलीस?. पॅलेस्टाइन बचावच्या नावाखाली हमास ही दहशतवादी संघटना आणि त्यांच्या नेत्यांचा योद्धयासारखा प्रचार केला जातोय. हे मान्य नाही” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन म्हणाले. शशी थरुर यांना का हटवलं?

आययूएमएलने सुद्धा पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ कोझिकोड येथे एका विशाल रॅलीच आयोजन केलं होतं. केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटच (यूडीएफ) सरकार आहे. आययूएमएल सत्तेत काँग्रेससोबत आहे. हजारो IUML समर्थकांनी पॅलेस्टाइन एकजुटता मानवाधिकार रॅलीमध्ये सहभाग घेतला. या रॅलीमध्ये काँग्रेस नेते शशी थरुर यांनी इस्रायलवर 7 ऑक्टोबरला झालेला हल्ला दहशतवादी कृत्य होतं, असं म्हटलं होतं. त्यानंतर शशी थरुर यांच्यावर बरीच टीका झाली. त्यानंतर केरळमध्ये मुस्लिमांसाठी काम करणारी संघटना ‘महल एम्पावरमेंट मिशन’ ने (एमईएम) शुक्रवारी शशी थरुर यांना 30 ऑक्टोबरच्या कार्यक्रमातून हटवण्याचा निर्णय घेतला.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.