सर्वात मोठी बातमी! दिल्लीत जमीन हादरली, भूकंपाचे तीव्र धक्के
देशाची राजधानी दिल्ली आज भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली आहे. हजारो नागरीक या घटनेनंतर रस्त्यावर आले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे एका ठिकाणी थेट इमारत झुकल्याची माहिती मिळत आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आलीय. दिल्लीत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्याची मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली-एनसीआर परिसरासह संपूर्ण देशात भूकंपाचे झटके जाणवले आहेत. या भूकंपाचं केंद्रस्थान अफगाणिस्तान असल्याची माहिती मिळत आहे. भूकंप जाणवल्याने नागरिकांची मोठी गर्दी रस्त्यावर जमा झालीय. दिल्लीतील नागरिकांना 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची अचूक तीव्रता अद्याप स्पष्ट नाही. पण सहा रिश्टर स्केल पेक्षा जास्त रिश्टर स्केलची तीव्रता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे नागरीक प्रचंड भयभीत झाले आहेत. भूकंपाते तीव्र धक्के भारतासह, तजाकिस्तान आणि चीनमध्ये सुद्धा जाणवल्याची माहिती मिळत आहे.
दिल्लीत रात्री 10 वाजून 17 मिनिटांच्या सुमरास भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची चाहूल लागल्यानंतर लगेच नागरीक घराबाहेर पडू लागले. रात्रीची वेळ असल्यामुळे सर्वाधिक नागरीक हे आपल्या घरात होते. ते झोपेच्या तयारीत होते. असं असताना अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अनेक नागरीक भूकंपाचे धक्के जाणवताच घराबाहेर पडले आणि रस्त्यावर आले. त्यामुळे रस्त्यावर नागरिकांची गर्दी जमली.
Prayers for everyone safety.??#earthquake#Delhi #NCR #หมอหลวงep1 pic.twitter.com/FvY1SY9Qzd
— CAPF Seema Bhawani ?? (@seema_bhawani) March 21, 2023
इमारत झुकल्याची माहिती
या भूकंपात दिल्लीच्या शकरपूर मेट्रो पिल्लर 51 जवळ थेट इमारत झुकल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली-एनसीआर भागात बसलेले झटके सर्वात तीव्र होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेनंतर मेट्रोची वाहतूक तात्पुरती स्वरुपात बंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून (नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी) मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या फैजाबाद येथे भूकंपाचं केंद्र होतं. त्याची तीव्रता तब्बल 6.6 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे तीव्र धक्के दिल्लीतही जाणवले. हे धक्के इतके तीव्र होते की, दिल्लीच्या शकरपूर परिसरात एक इमारत झुकल्याची माहिती अग्निशमन दालाला मिळाली आहे.
पाकिस्तानच्या लाहौर शहरातही तीव्र धक्के
Earthquake in Pakistan Lahore…. No report of any casualty as of now.#earthquake#Afghanistan pic.twitter.com/LvGXlp1O8h
— The Environment (@theEcoglobal) March 21, 2023
विशेष म्हणजे पाकिस्तानच्या लाहौर शहरातही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. लाहौरचे एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अतिशय थरारक असा हा व्हिडीओ आहे.