Earthquake: दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाबसह उत्तर भारत भूकंपाने हादरला; भूकंपाचे धक्के बसताच नागरिक घरातून पळाले

दिल्ली, दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीर, (Delhi Ncr Jammu Kashmir) उत्तराखंड, पंजाबसह उत्तर भारतात आज सकाळी भूकंपाचे (Earthquake) तीव्र झटके जाणवले. आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले.

Earthquake: दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाबसह उत्तर भारत भूकंपाने हादरला; भूकंपाचे धक्के बसताच नागरिक घरातून पळाले
दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाबसह उत्तर भारत भूकंपाने हादरला; भूकंपाचे धक्के बसताच नागरिक घरातून पळाले
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 10:52 AM

नवी दिल्ली: दिल्ली, दिल्ली-एनसीआर, जम्मू-काश्मीर, (Delhi Ncr Jammu Kashmir) उत्तराखंड, पंजाबसह उत्तर भारतात आज सकाळी भूकंपाचे (Earthquake) तीव्र झटके जाणवले. आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील (afganistan) हिंदूकुश येथे होता. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक भयभीत झाले. भूकंपामुळे तब्बल 15 ते 20 सेकंद जमीन हलली. अचानक घरातील वस्तू हलू लागल्याने भेदरलेल्या नागरिकांनी जीव मुठीत घेऊन तात्काळ घरातून पलायन केले. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनाही तात्काळ घराबाहेर काढण्यात आलं. अचानक धरणी हल्ल्याने अनेक लोक घाबरलेले दिसत होते. भूकंपाचे धक्के बसल्यानंतरही अनेक लोक भीतीपोटी बराच वेळ घराबाहेरच आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे सर्वाधिक धक्के जाणवले. मात्र, या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचं वृत्त आहे.

दिल्ली-एनसीआरमधील नोएडामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. जम्मूमधील अनेक जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. काश्मीर खोऱ्यातही भूकंपाचे धक्के जाणवले गेले. दिल्ली, पंजाब आणि उत्तर भारतातही भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. घरातील वस्तू हलताच अनेक लोक मुलाबाळांना घेऊन घराबाहेर पडले. मात्र, अवघ्या काही सेकंदानंतर धरणी हलण्याचं बंद झालं. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. भूकंपाचे धक्के बसतात अनेकांच्या घरातील सामान खाली पडले. भांडीकुंडी जमिनीवर पडले. मात्र, या धक्क्यांमुळे भिंतींना तडे गेले नाहीत. किंवा कोणतेही मोठे आर्थिक नुकसान झालेलं नाही. तसेच कोणतीही जीवित हानी झाली नाही, असं सूत्रांनी सांगितलं. मात्र, भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिक भयभीत झाले होते, असंही सूत्रांनी सांगितलं.

कच्छ भूकंपाने हादरले

दरम्यान, शुक्रवारी गुजरातच्या कच्छमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.1 एवढी नोंदवली गेली होती. गांधीनगर येथील आयएआरनुसार काल सकाळी 10 वाजून 16 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. कच्छच्या रापडमध्ये हे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्र बिंदू भूसपाटीच्या 19.1 एवढा खोल होता. मात्र, या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झालं नाही. यापूर्वी 2001मध्ये कच्छमध्ये मोठा भूकंप झाला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली होती.

संबंधित बातम्या:

धक्कादायक! हिजाब घातला म्हणून महाविद्यालयात प्रवेश नाकारला; विद्यार्थीनींची कोर्टात धाव, कर्नाटकच्या उडपीमधील प्रकार

ट्रेनमध्ये अपंग, वरिष्ठ नागरिक यांच्याशिवाय या अन्य प्रवाशांना सुद्धा मिळते प्रवास भाड्यात सूट, चला तर मग जाणून घेऊया

Republic Day Parade: राजपथावर महाराष्ट्राचा डंका, पॉप्युलर चॉईस कॅटेगिरीत पहिलं बक्षिस; सामान्य कॅटेगिरीत उत्तर प्रदेश अव्वल

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.