Boycott Maldives | मालदीवला भारी पडला भारताशी पंगा, ‘या’ प्रसिद्ध ट्रॅव्हल कंपनीकडून सर्व फ्लाइट बुकिंग रद्द

Boycott Maldives| भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालदीव सरकारमधील तीन मंत्र्यांनी अपमान केला. त्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. मालदीवला याची मोठी किंमत चुकवावी लागली आहे. एका प्रसिद्ध ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनीने थेट मालदीवच फ्लाइट बुकिंगच रद्द केलय.

Boycott Maldives | मालदीवला भारी पडला भारताशी पंगा, 'या' प्रसिद्ध ट्रॅव्हल कंपनीकडून सर्व फ्लाइट बुकिंग रद्द
india vs maldives
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 8:29 AM

Boycott Maldives | भारताशी पंगा घेणं मालदीवला चांगलच महाग पडल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या मालदीव सरकारमधील तीन मंत्र्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मालदीव सरकारमधील मंत्र्यांच्या या टिप्पणीनंतर भारतात संतापाची भावना आहे. बॉयकॉट मालदीव सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. मालदीवकडून आता हा सर्व वाद शांत करण्याचा प्रयत्न होत आहे. मालदीव सरकारने मोदींविरोधात टिप्पणी करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. पण या सगळ्यानंतरही वाद शांत होताना दिसत नाहीय. अनेक भारतीयांनी आपली मालदीव ट्रीप रद्द केली आहे. सोशल मीडियावर ट्रीप रद्द केल्याचे स्क्रिनशॉट सुद्धा टाकले आहेत. भारताविरोधात टिप्पणीचा मुद्दा भारताने मालदीव सरकारसमोर जोरदार पद्धतीने मांडला. मालदीवमधल्याच विरोधी पक्षाच्या नेत्यानी आपल्याच सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मालदीवमधील मीडियाच्या माहितीनुसार, युवा मंत्रालयातील मंत्री मालशा शरीफ, मरियम शिउना आणि अब्दुल्ला महजूम माजिद यांना त्यांच्या पदावरुन निलंबित करण्यात आलं आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू एका आठवड्याच्या चीन दौऱ्यावर निघत असताना हा सर्व वाद सुरु झालाय.

भारतातल्या या कंपनीचा मोठा निर्णय

मालदीव बहिष्कार अभियानादरम्यान EaseMyTrip ने एक मोठ पाऊल उचललय. त्यांनी मालदीवला जाणारे सर्व फ्लाइट बुकिंग रद्द केल्या आहे. EaseMyTrip एका ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपला गेले होते. त्यानंतर मालदीवच्या काही मंत्र्यांनी अपमानजनक टिप्पणी केली. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर EaseMyTrip ने हा निर्णय घेतला आहे.

चलो लक्षद्वीप

ऑनलाइन ट्रॅव्हल सॉल्यूशन प्रोवाइडर EaseMyTrip ने चलो लक्षद्वीप अभियान सुरु केलय. EaseMyTrip च मुख्यालय दिल्लीत आहे. याची स्थापना 2008 मध्ये निशांत पिट्टी, रिकांत पिट्टी आणि प्रशांत पिट्टीने केली होती. 4 जानेवारीला प्रशांत पिट्टीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलय की, लक्षद्वीपच पाणी आणि समुद्र किनारे मालदीव इतकेच सुंदर आहेत. EaseMyTrip या प्राचीन स्थळाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष ऑफर घेऊन येणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.