AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिजीटल मतदान ओळखपत्राची प्रतीक्षा संपली, Voter ID कसं डाऊनलोड करणार?

केंद्रीय निवडणूक आयोग 25 जानेवारीपासून डिजीटल मतदार ओळखपत्र देण्याची सुविधा सुरु करत आहे. (ECI Digital voter card)

डिजीटल मतदान ओळखपत्राची प्रतीक्षा संपली, Voter ID कसं डाऊनलोड करणार?
डिजीटल वोटर कार्ड
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 5:00 PM

नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगानं (Election Commission) राष्ट्रीय मतदार दिनादिवशी डिजीटल मतदान ओळखपत्र(Digital Voter Card) जारी करणार आहे. 25 जानेवारीला अधिकृतपणे डिजीटल वोटर कार्ड जारी केले जाणार आहे. मतदार त्यांनंतर निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरुन मतदारकार्ड पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करु शकतात. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स अगोदरच आपल्याला डिजीटल स्वरुपात उपलब्ध झाली आहेत. ( ECI going to launch Digital Voter Card from 25 January know how to download)

पाच राज्यांच्या निवडणुकीपूर्वी डिजीटल वोटर कार्डचे लाँचिंग

देशातील 5 राज्यांमध्ये येत्या काही महिन्यामध्ये निवडणूक लागणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पाँडिचेरीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, प्रत्येक नागरिकाला (Digital Voter Card) मिळू शकेल का हे पाहावे लागणार आहे.

पहिल्या टप्प्यात नव्या मतदारांना डिजीटल वोटर कार्ड

पहिल्या टप्प्यात 25 ते 31 जानेवारी दरम्यान नव्या मतदारांना डिजीटल वोटर कार्ड मिळणार आहे. या कालावधीमध्ये जे नवे मतदार नोंदणी करतील त्यांना डिजीटल वोटर कार्ड मिळेल.

मोबाईल नंबर रजिस्टर असणारांना 1 फेब्रुवारीपासून डिजीटल कार्ड

ज्या मतदारांचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे नोंदवलेला असेल त्यांना 1 फेब्रुवारीपासून डिजीटल वोटरकार्ड मिळणार आहे. ज्यांचा क्रमांक निवडणूक आयोगाकडे नाही त्यांना तो निवडणूक आयोगाकडून पडताळणी करुन घ्यावा लागणार आहे.

पीडीएफ स्वरुपात मिळणार डिजीटल कार्ड

सर्व मतदारांना डिजीटल कार्ड पीडीएफ स्वरुपात मिळेल. नव्या मतदारांना दोन्ही स्वरुपातील मतदान कार्ड मिळणार आहे. डिजीटल मतदान ओळखपत्रावर मतादाराच्या माहितीसह क्यूआर कोड देखील देण्यात येणार आहे. डिजीटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. वेबसाईटवर तुम्हाला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीद्वारे अकाँऊट तयार करावे लागेल. त्यानंतर तुम्ही डिजीटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करता येईल.

संबंधित बातम्या:

( ECI going to launch Digital Voter Card from 25 January know how to download)

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.