फारुख अब्दुल्लांची ED कडून चौकशी, ओमर अब्दुल्लांचा सुडाचा आरोप
जम्मू काश्मिरमध्ये 43 कोटींच्या घोटाळा प्रकरणी ईडीने आज (19 ऑक्टोबर) नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांची चौकशी केली.

श्रीनगर : जम्मू काश्मिरमध्ये 43 कोटींच्या घोटाळा प्रकरणी ईडीने आज (19 ऑक्टोबर) नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांची चौकशी केली. ईडी सध्या जम्मू काश्मिर क्रिकेट असोसिएशनशी संबंधित घोटाळ्याचा तपास करत आहे. फारुख अब्दुल्ला यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राजकीय सुडातून ही चौकशी होत असल्याचा आरोप केलाय. उमर म्हणाले, “गुपकार घोषणा करत जम्मू काश्मिरमध्ये महाआघाडी तयार झाल्यानेच सरकारकडून ही सुडाची कारवाई केली जात आहे” (ED questions Farooq Abdullah in JKCA scam Omar Abdullah calls it political vendetta).
जम्मू काश्मिर क्रिकेट असोसिएशनशी संबंधित हा घोटाळा (J-K Cricket Association scam) 43 कोटींचा असल्याचं सांगितलं जात आहे. जम्मू काश्मिर क्रिकेट असोसिएशनच्या (JKCA) 10 सदस्यांमध्ये फारूख यांचाही समावेश होता. त्यांच्यावर 2005 ते 2012 दरम्यान अनेक बनावट खात्यांचा उपयोग करुन पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे.
ईडीच्या कारवाईनंतर उमर अब्दुल्ला यांनी ट्विट केलं, ‘नॅशनल कॉन्फरन्स पक्ष ईडीने पाठवलेल्या समन्सचं उत्तर देईल. गुपकार घोषणा करत जम्मू काश्मिरमध्ये महाआघाडी तयार झाल्यानेच राजकीय सुडासाठी ही कारवाई केली जात आहे.’ यावेळी उमर अब्दल्ला यांनी फारुख अब्दुल्ला यांच्या घरावर कोणतीही धाड टाकली नसल्याचंही स्पष्ट केलं.
The party will be responding to this ED summons shortly. This is nothing less then political vendetta coming days after the formation of the People’s Alliance for Gupkar Declaration. To set the record straight no raids are being conducted at Dr Sahib’s residence.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) October 19, 2020
जम्मू काश्मिर क्रिकेट असोसिएशनशी संबंधित घोटाळा 2012 मध्ये उघड
जम्मू काश्मिर क्रिकेट असोसिएशनशी संबंधित हा घोटाळा 2012 मध्ये समोर आला होता. तेव्हा JKCA चे कोषाध्यक्षांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. यात माजी महासचिव मोहम्मद सलीम खान आणि माजी कोषाध्यक्ष एहसान मिर्जा यांच्यावर आरोप करण्यात आले होते. यानंतर या घोटाळ्यात एकापाठोपाठ 50 नावं जोडली गेली. यानंतर अब्दुल्ला यांनी JKCA च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ते 30 वर्षांपासून या पदावर होते.
हेही वाचा :
Article 370 : अब्दुल्ला आणि मुफ्ती यांना विश्वासात घ्यायला हवं होतं : शरद पवार
कलम 370 काढलं तर आम्ही भारतापासून वेगळे होऊ, फारुख अब्दुल्लांची धमकी
चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्याची आशा- फारुख अब्दुल्ला
ED questions Farooq Abdullah in JKCA scam Omar Abdullah calls it political vendetta