Mahadev Betting App : काँग्रेसची निदर्शने सुरु असतानाच जयपुरासह अनेक ठिकाणी ED चे छापासत्र
एकीकडे ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसची निदर्शने सुरु असतानाच ४० हजार कोटी रुपयांच्या महादेव बेटिंग घोटाळ्याप्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे.

Jaipur News: महादेव एप प्रकरणात जयपुरात ईडीने छापे टाकले आहेत. छत्तीसगढ येथून ईडीच्या टीमने जयपूरात दाखल होत अनेक ठिकणी छापे टाकले आहेत. येथील सोडाला क्षेत्रातील भरत दाधिच या ठिकाणी मोठी कारवाई सुरु आहे. या आधी देखील महादेव सट्टा एप प्रकरणात जयपूरात छापे टाकण्यात आले होते. मानसरोवर या ठिकाणी या गँगशी संबंधिक अनेक लोकांना ईडीने अटक केली आहे. गेल्यावेळी ईडीने लँड रोव्हर डिफेन्डर आणि वॉल्व्हो XC60 सारख्या लक्झरी कार जप्त केल्या होत्या.
जयपूरमधील महादेव बेटिंग एपच्या ४० हजार कोटी रुपयांच्या बेटिंग घोटाळ्याप्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. छत्तीसगडहून ईडीची टीम जयपूर येथे दाखल झाली असून अनेक ठिकाणी छापे सुरु आहेत.
जयपूरातील अनेक व्यापारी अडकले
महादेव सट्टा एप प्रकरणात दुबईतून अवैध ऑनलाईन सट्टेबाजी होत आहे. यात पोकर्स , चान्स गेम्स, कार्ड गेम्स आणि क्रिकेट, बॅडमिन्टन, टेनिस आणि फुटबॉल तसेच अनेक खेळांवर सट्टा लावला जाई. त्यात देशभरातील नेटवर्कद्वारे एकूण ३० कॉल सेंटर चालविले जात आहेत. यात जयपूरातील अनेक व्यापारी अडकलेले आहेत. हवालाद्वारे यासाठीचे आर्थिक व्यवहार होत आहेत. क्रिप्टोकरन्सी आणि खोट्या कंपन्यांद्वारे पैसे वापरले जात होते. याचे अनेक पुरावे सक्तवसुली संचनालयाला ( ईडीला ) मिळाले आहेत.




जयपुर काँग्रेसची निदर्शने सुरु असताना रेड
नॅशनल हेराल्ड केसमध्ये ईडीने काँग्रेसच्या नेता सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर देशभरात ईडीच्या कार्यालयांबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची निदर्शने होत आहेत.त्यातच बुधवारी जयपुरमध्ये काँग्रेसने ईडी दफ्तर के बाहेर काँग्रेसने निदर्शने सुरु असतानाच ही कारवाई सुरु झाली आहे. जयपुरमध्ये ईडीच्या कार्यालयाबाहेर माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, विरोधी पक्ष नेते टीकाराम जुली आणि कार्यकर्ते जमले आहेत.