कन्नड रक्षण वेदिकेने मुख्यमंत्री शिंदेंच्या पुतळ्याचे केले दहन, महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी

कर्नाटकातील गदगमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन केले गेल्याने वातावरण चिघळले आहे.

कन्नड रक्षण वेदिकेने मुख्यमंत्री शिंदेंच्या पुतळ्याचे केले दहन, महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 3:43 PM

बेळगावः महाराष्ट्र-कर्नाटक वाद आता आणखी विकोपाला गेला आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक पक्षातील खासदारांनी सीमावादाचा प्रश्न केंद्राने सोडवावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे हा वाद केंद्राने सोडवण्याच्या मागणीने जोर धरला असतानाच कर्नाटकात मात्र महाराष्ट्रविरोधी वातावरणाने आणखी जोर पकडला आहे.

आज कर्नाटकात महाराष्ट्राविरोधात वातावरण आणखी चिघळले असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी गदगमध्ये दहन केले आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन केले गेल्याने आता कर्नाटकातील मराठी भाषिकांविरोधात तीव्र संपात व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात लोकांच्या भावना भडकवल्या जात असल्याचे मत सीमाभागातील मराठी भाषिकांमधू व्यक्त केली जात आहेत.

कर्नाटकातील गदगमध्ये महारष्ट्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शन केली आहेत.

यावेळी महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांवर चढून कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन केले गेल्याने कर्नाटकातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गदग शहरात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राविरोधात आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी त्यांना समज देण्याचाही प्रयत्न केला. तरीही कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातून गेलेल्या वाहनांवर चढून जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनं केली गेल्याने पोलिसांनी धरपकड केली.

तर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यामधील काही गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला असल्याने सीमावादाला आता त्यामुळे वेगळे वळण लागले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.